भारताच्या पहिल्यांदाच मत देणाऱ्या नवमतदारांना उद्देशून पत्र

भारताच्या पहिल्यांदाच मत देणाऱ्या नवमतदारांना उद्देशून पत्र

2019 मध्ये 29 राज्यांमधील तब्बल 282 जागांमध्ये युवा मते अतिशय निर्णायक ठरतील, असे विश्लेषण आहे

  • Share this:

प्रिय नवीन मतदार,

त्यांना चोरी करू देऊ नका

जरी आपल्याला जाणवत नसले,

तरी उभे राहा आणि आधारस्तंभ बना,

तयार व्हा, चला आणि मतदान करा!

फोटो स्रोत Unsplash.com

फोटो स्रोत Unsplash.com

चालू 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये 18- 19 वयोगटातील 15 दशलक्ष नवीन मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. 2019 मध्ये 29 राज्यांमधील तब्बल 282 जागांमध्ये युवा मते अतिशय निर्णायक ठरतील, असे विश्लेषण आहे, त्यामुळे हा आपला उजळून निघण्याचा क्षण आहे. निवडणुका अनिश्चित असतात आणि राजकीय पक्ष आपले लक्ष आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियावरील कम्युनिकेशनपासून लक्षवेधी अभियानांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा वापर करतात.

एका ट्विटर सर्वेक्षणानुसार, 80% भारतीय युवा अपडेट राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात व त्यामुळे आपल्यासारख्या पहिल्यांदा मतदान करणा-या मतदारांमध्ये संभ्रम होऊ शकतो, कारण समोर असलेल्या पर्यायांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडत असतो. संभ्रमित होणे सामान्य आहे, पण आपले पर्याय काय आहेत आणि तथ्ये बरोबर माहिती असणे हेही अतिशय महत्त्वाचे आहे. कारण, ही आपली पहिलीच वेळ असल्यामुळे मतदान करण्याविषयी आपल्याला पुढील काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे.

जेव्हा शंका असेल, तेव्हा हेल्पलाईन वापरा

जर आपल्या माहितीचे सर्व स्रोत संभ्रम निर्माण करणारे आहेत, असे वाटले, तर त्याचे परिपूर्ण सोल्युशन असे आहे. 2019 निवडणुकांबद्दल आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची एक मतदार हेल्पलाईन आहे. मतदार यादीवरील आपले स्वत:चे तपशील शोधण्यासाठी किंवा आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आपण 1950 वर कॉल करू शकता (टोल फ्री).

हायटेक, त्रुटीरहित मतदान

मतदानातील अफरातफरी आणि पोलिंग स्टेशन ताब्यात घेण्याच्या अनेक प्रसंगांविषयी चिंतित आहात का? ह्या निवडणुकीच्या वेळेस, सरकारने पहिल्यांदा मतदान करणा-यांसह प्रत्येकाच्या मताला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व मतदारसंघांमध्ये व्होटर व्हेरिफाएबल पेपर ऑडीट ट्रेल (VVPAT) प्रणाली आणली आहे. आपले काम सोपे होण्यासाठी ईव्हीएम्सवर पक्षाच्या चिन्हाच्या बाजूला उमेदवाराचा फोटो असेल, त्यामुळे आपण ह्यावेळी कोणाला मत देत आहात, ह्याविषयी स्वत:ची 100% खात्री करून घेऊ शकाल.

एनओटीए पर्याय

 फोटो: Firstpost.com

फोटो: Firstpost.com

आपले मतचा वाया जाऊ नये म्हणून मतदान करण्यासाठी जाणे अतिशय गरजेचे आहे. परंतु जर निवडणुकीला उभ्या राहिलेल्या एकाही सदस्यावर आपल्याला विश्वास वाटत नसेल, तर आपण काय करावे? आपल्या पोलिंग स्टेशनला जा आणि एनओटीएवर म्हणजेच ‘नन ऑफ द अबोव्ह’ पर्यायावर क्लिक करा- सरकारने दिलेला हा सर्वांत शक्तिशाली पर्याय आहे. त्यामुळे मोठी वचने देणारी घोषणापत्रे परंतु जिथे ती प्रत्यक्षात आणणारे लोक नाहीत, अशा स्थितीविषयी युवा मतदार आपला असंतोष व्यक्त करू शकतात.

मत का द्यावे?

आज स्वत:ची जाणीव असणारे व संवेदनशील युवा मतदार भारतातील सर्वांत शक्तिशाली राजकीय शक्ती आहे. युवा लोक गरीब व वंचितांसाठी कृतीत उतरणा-या योजनांचा पाठपुरावा करत असल्यामुळे आपण महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर उत्तरदायी असलेल्या सच्च्या सरकारसाठी आपली क्षमता वापरणे गरजेचे आहे. शाश्वत विकासासाठी जे काम करतील, शैक्षणिक कोटा सिस्टीम दूर करतील, जनतेच्या आरोग्याचे अधिक चांगले पर्याय देतील आणि सर्वांना उपलब्ध असतील अशा प्राथमिक सुविधा उपलब्ध करतील, अशा सक्रिय नेत्यांनाच आपण निवडून द्यायला हवे.

मतदानाची सुलभ प्रक्रिया

प्रत्येक मत महत्त्वाचे आहे आणि देशाला आपण मोठ्या संख्येने येऊन मत देण्याची गरज आहे व त्यातून आपण हा कठोर निर्णय घ्यावा की, सध्याच्या पक्षाला पाठबळ देऊन त्यांच्या वचनपूर्तीसाठी संधी द्यावी किंवा नवीन नेत्यांना पुढे आणून त्यांच्यावर देशाची जबाबदारी‌ द्यावी. निवडणूक स्लीपच्या ऐवजी ह्या वर्षी ही प्रक्रिया आधीपेक्षाही खूप सोपी आहे. आपल्याला आपले पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा आपला पासपोर्ट अशा कोणत्याही ओळखपत्रासाठीच्या 12 वैध कागदपत्रांपैकी एक सोबत ठेवून यावे लागेल आणि आपले मत द्यावे लागेल.

आपले मत पहिल्यांदा देताना आपल्यापैकी अनेक जण स्वाभाविक प्रकारे उत्तेजित असले तरी, इतरांना उदासीनतेमधून बाहेर काढून, देशातील लोकशाहीला कार्यरत ठेवण्याच्या अतिशय महत्त्वपूर्ण कामामधील सहभासाठी त्यांचे मन वळवणे हेही आपल्याला शक्य आहे. कसे? आपले मत अगदी लवकर द्या आणि आपल्या परिसरातील ज्यांना सोबतीची गरज असेल, त्यांना मतदानासाठी घेऊन जा. हे इतके सोपे आहे!

लक्षात ठेवा की, सत्तेत असलेले सरकार आपल्या गरजा व आपल्या विचारांवर तेव्हाच आधारित असेल जेव्हा आपण मतदान करतो आणि आपल्या सर्वांच्या मतांमुळे देशाला दिशा मिळते. 23 मे रोजी मतगणनेपूर्वी आता अगदी थोडे टप्पेह शिल्लक आहेत. त्यामुळे चला, मतदान करा! सहभाग घेणारा आत्मविश्वास असलेला भारतीय होण्याची ही आपली हक्काची संधी आहे!

बटन दबाओ देश बनाओ हा नेटवर्क 18 चा उपक्रम आहे व तो आरपी- संजीव गोयंका ग्रूपद्वारे प्रस्तुत आहे व त्यामध्ये चालू लोकसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक भारतीयाला मतदान करण्याचा आग्रह केला जात आहे. हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावरील संभाषण फॉलो करा- #ButtonDabaoDeshBanao.

 

First published: May 13, 2019, 2:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading