खडसेंचा मूळ व्यवसाय शेती मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी ?

बातमी आहे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मालमत्तेसंदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका पत्राची...

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 12:47 PM IST

खडसेंचा मूळ व्यवसाय शेती मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी ?

मुंबई, 16 जुलै : बातमी आहे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मालमत्तेसंदर्भात प्रश्न उपस्थित करणाऱ्या एका पत्राची... खडसे यांचा मूळ व्यवसाय शेती असून त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी असा सवाल उपस्थित करत, याची चौकशी व्हावी अशी मागणी करणारं पत्र न्यायमूर्तींना पाठवण्यात आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. के. तहिलरामानी यांना पाठवण्यात आलेल्या पत्रासाठी, जळगावचे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या लेटरहेडचा वापर करण्यात आलाय. या पत्रावर भोळे यांच्या स्वाक्षरीप्रमाणे हुबेहुब स्वाक्षरी दिसतेय. मात्र हे पत्र मी पाठवलं नसल्याचं आमदार सुरेश भोळे यांन स्पष्ट केलंय.

LIVE : काही झालं तरी मुंबईकरांना दुध कमी पडू देणार नाही - महादेव जानकर

त्यामुळं भोळे यांच्या लेटरहेडचा वापर करत न्यायमूर्तींना पत्र पाठवलं कुणी हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. पण या लेटरहेडवर जावक क्रमांक मात्र नमूद करण्यात आलेला नसल्यानं आपल्याला बदमान करण्याच्या हेतूनं खोडसाडपणे कुणीतरी हे कृत्य केल्याचा दावा आमदार भोळे यांनी केलाय.

खडसे आमचे नेते असून त्यांच्याविषयी तक्रार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही भोळे म्हणाले. दरम्यान, याबाबत आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली असून चौकशीची मागणी केलीय. तसंच याप्रकरणी भोळे यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्र पाठवून खुलासा करावा लागलाय.

Loading...

हेही वाचा...

...तर मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंवर एफआयआर करेन - संजय निरुपम

रेशम टिपनीस बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर

FIFA World Cup 2018 फ्रान्सच ठरला जगज्जेता, पॅरिसमध्ये आलं तुफान!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 09:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...