Jalgaon Election 2018: एकनाथ खडसेंनी ज्याचा केला प्रचार,तो भाजप उमेदवार पराभूत

Jalgaon Election 2018: एकनाथ खडसेंनी ज्याचा केला प्रचार,तो भाजप उमेदवार पराभूत

आधी प्रचारात न उतरणारे एकनाथ खडसे यांनी नाही हा म्हणत ज्या उमेदवाराची सभा घेतली त्याचा पराभव झाल्याची बाब समोर आली

  • Share this:

जळगाव, 03 आॅगस्ट : एकीकडे जळगाव महापालिकेत भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बाजूला सारून जिंकून दाखवलंय. तर दुसरीकडे आधी प्रचारात न उतरणारे एकनाथ खडसे यांनी नाही हा म्हणत ज्या उमेदवाराची सभा घेतली त्याचा पराभव झाल्याची बाब समोर आलीये.

जळगाव महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनात खडसे हे या निवडणुकीपासून अलिप्त असल्याचे पाहायला मिळाले होते, अधिवेशन आणि मुक्ताईनगर नगर पंचायतीच्या निवडणूक कारणामुळे ते दूर असल्याचं सांगितलं जात होतं मात्र, अगोदरच जिल्ह्यात गिरीश महाजन आणि खडसे असे सरळ सरळ दोन गट भाजपमध्ये दिसून येत असल्याने विविध तर्क विर्तक यामुळे लावले जात होते. पण तरीही भाजपचे नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या प्रचार कार्यात खडसे सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी सभा घेऊन खडसेंनी खणखणीत भाषण ठोकलं होतं.  खडसे यांनी प्रचार कार्यात सहभागी झाल्यावर महापालिकेत सत्ताधारी सुरेश जैन गटावर तोफ डागली आणि यावेळी भाजपची सत्ता महापालिकेवर येईल असा दावा केला.

पण ज्या रवींद्र पाटील यांच्या खडसे यांनी प्रचार सभा घेतली होती त्या रवींद्र पाटील यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. रवींद्र पाटील यांचा फक्त 1800 मतांनी पराभव झाला. रवींद्र पाटील यांनी प्रभाग क्रमांक 12 मधून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय.

दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीसाठी 75 जागांसाठी मतमोजणीचा कल स्पष्ट झालाय. भाजपने सर्वाधिक 57 जागांवर आघाडी घेऊन बहुमत मिळवले आहे.  तर मागील निवडणुकीत चौथ्या स्थानावर असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रचार सभा घेतली होती. त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मोठ्या नेत्यांने प्रचाराकडे पाठ फिरवली होती. याचाच फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसला.

हेही वाचा

Jalgaon Election 2018: गुरू सुरेशदादांवर भारी पडला शिष्य

Jalgaon Election 2018: ४० वर्षांनंतर सुरेशदादांच्या गडाला सुरंग

Jalgaon Election 2018: जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुफडासाफ

Jalgaon Corporation election 2018 : जळगावात 'कमळ' उमललं, सुरेशदादांना धक्का

LIVE : सांगलीच्या निकालात टि्वस्ट, काँग्रेस-राष्ट्रवादीला मागे टाकत भाजपची आघाडी

जळगावात ओवेसींची एंट्री, एमआयएमने जिंकल्या 3 जागा

First Published: Aug 3, 2018 03:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading