एकनाथ खडसेंनी सरकारला खडसावलं

एकनाथ खडसेंनी सरकारला खडसावलं

एकनाथ खडसेंनी सरकारला सभागृहात चांगलंच खडसावलं. विरोधी पक्षाप्रमाणे खडसेंनी सरकारला धारेवर धरलं.

  • Share this:

29 मार्च : एकनाथ खडसेंनी सरकारला सभागृहात चांगलंच खडसावलं. विरोधी पक्षाप्रमाणे खडसेंनी सरकारला धारेवर धरलं.

काय म्हणाले खडसे?

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही काय फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का? विदर्भात 24 तास वीज कनेक्शन देता, जळगावला 14 हजार शेतकऱ्यांनी पैसे भरले, मात्र अजून कनेक्शन का नाही?

निवडणुकीत आश्वासन दिलं होतं 24 तास वीज देऊ. पण वीज मुबलक नाही. आपलं सरकार आलं, पण आपण शब्द पाळला पाहिजे.

शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचं वीज बिल थकलं असेल, तर व्याज माफ करा, दंड माफ करा. वीज कनेक्शन कट करणार नाही, असं आश्वासन सरकारने द्यावं.

राज्यभर औद्योगिक गुंतवणूक किती झाली?

उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी युनिट आलं का , एखादा कारखाना उभा राहिला का?

कृषीपंपाची वीज कापू नका,शेतकऱ्याला अडचणीत आणू नका,थकीत वीज बिलावरचं व्याज माफ करा, असे महत्त्वाचे मुद्दे एकनाथ खडसेंनी मांडले. खडसेंनी दिलेल्या या घरच्या अहेराची चर्चा सुरू आहे.

Tags:
First Published: Mar 29, 2017 05:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading