Home /News /news /

एकनाथ खडसे 22 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसे 22 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शक्यता नाकारली होती.

    उस्मानाबाद, 20 ऑक्टोबर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे. आता तर 22 ऑक्टोबर रोजी खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असे बोलले जात आहे. पण, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अशी शक्यता नाकारली आहे. देवेंद्र फडणवीस हे उस्मानाबादमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. यावेळी पत्रकारांनी एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे का, असे विचारले असता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे आणि अजितदादांना हीच ती संधी, फडणवीसांचा सणसणीत टोला 'असे मुहूर्त रोज सांगितले जात असतात. मी त्यावर बोलणार नाही' असं म्हणत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याचे टाळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार आहे.  मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. एवढंच नाहीतर  खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देणार आहे. नेहा कक्करने गुपचूप उरकला रोका? सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा VIDEO याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शक्यता नाकारली होती.  'एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यांनी आमच्यासोबत राहिले पाहिजे. राजकारण कसे आहे, हे त्यांना चांगले माहिती आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे' असं फडणवीस म्हणाले होते. मात्र, दुसरीकडे आता एकनाथ खडसे हे पुढील दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये नेमकं काय घडते हे पाहण्याचे ठरणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या