राजकारणात पात्रता नसलेलेच पदावर जाऊन बसतात !- खडसे

राजकारणात पात्रता नसलेलेच पदावर जाऊन बसतात !- खडसे

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या मनातली खदखद पुन्हा बाहेर पडलीय. राजकारणात हल्ली पात्रता नसलेले लोकच उच्च पदी जाऊन बसतात, अशी खदखद खडसेंनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता व्यक्त केलीय. ते जळगावातील एका कार्यक्रमात बोलत होते.

  • Share this:

04 फेब्रुवारी, जळगाव : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या मनातली खदखद पुन्हा बाहेर पडलीय. राजकारणात हल्ली पात्रता नसलेले लोकच उच्च पदी जाऊन बसतात, अशी खदखद खडसेंनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता व्यक्त केलीय. ते जळगावातील एका कार्यक्रमात बोलत होते.

एकनाख खडसे म्हणाले, ''सरदार वल्लभभाई यांची देशाचा पंतप्रधान होण्याची पात्रता होती. परंतू, राजकारणात आपल्याला माहिती आहे, जे पात्र असतात ते बाजूला पडतात आणि जे अपात्र असतात, ज्यांची योग्यता नाही तेच उच्च पदावर जाऊन बसतात. पण मला अपात्र म्हणायचे नाही तर राजकारणाच्या सोयीसाठी पुढे नेले जाते. असा उपरोधीत टोलाही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सध्याच्या राजकिय परिस्थितीवर लगावलाय.

एकनाथ खडसेंचं मंत्रिमंडळातील पुनरागमन लांबत चालल्याने ते हल्ली सातत्याने आपल्याच पक्षाच्या भाजप सरकारवर जाहीरपणे टीका करू लागलेत. एवढंच नाहीतर दबावतंत्राचा भाग म्हणून विरोधी पक्षनेत्यांच्याही आवर्जून भेटीगाठी घेऊ लागलेत. पण तरीही त्यांना मंत्रिपदाचं कुठलंच आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून मिळत नाहीये. कदाचित त्यामुळेच एकनाथ खडसेंच्या मनातली खदखद ही अशी वारंवार बाहेर पडू लागलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2018 09:42 PM IST

ताज्या बातम्या