या नेत्याकडे सोपवली मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

या नेत्याकडे सोपवली मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

विधानसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेसमध्ये एक महत्त्वाची नेमणूक झाली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी हायकमांडने एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली.

  • Share this:

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या आधी काँग्रेसमध्ये एक महत्त्वाची नेमणूक झाली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी हायकमांडने एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती केली. याआधी मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचं निरीक्षण करण्यासाठी 3 वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस त्यांनी केली होती.

धारावीचे 3 वेळा आमदार

एकनाथ गायकवाड यांनी लोकसभेमध्ये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात निवडणूक लढवली होती. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळेंनी त्यांचा इथे पराभव केला. त्याआधी 3 वेळा ते धारावीमधून आमदार झाले. त्यांनी राज्यमंत्रिपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस हायकमांडनं संजय निरुपम यांची उचलबांगडी करत मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा मिलिंद देवरा यांच्या खांद्यावर सोपवली होते.

पराभवानंतर राजीनामा

मिलिंद देवरा यांनी स्वतः दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र या जागेवर शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला.या पराभवानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर त्यांनीही राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले.

किल्ले भाड्याने देण्यात येणार का आणि कोणते? पर्यटन मंत्र्यांनी दिलं उत्तर

==========================================================================================================

वंचितमधून MIM बाहेर पडण्याचं हे आहे कारण, पाहा हा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: September 6, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading