उत्तर प्रदेशमध्ये राज्यराणी एक्स्पेसचे 8 डबे घसरले,12 जण जखमी

रामपूरजवळ राज्यराणी एक्स्प्रेसचे 8 डबे घसरले, 12 जण जखमी झाले, त्यातले 3 गंभीर जखमी आहेत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 15, 2017 03:37 PM IST

उत्तर प्रदेशमध्ये राज्यराणी एक्स्पेसचे 8 डबे घसरले,12 जण जखमी

15 एप्रिल : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एक रेल्वे अपघात झालाय. रामपूरजवळ राज्यराणी एक्स्प्रेसचे 8 डबे घसरले, 12 जण जखमी झाले, त्यातले 3 गंभीर जखमी आहेत. बचावकार्य जवळपास संपलाय.

रामपूर मेरठ राज्यराणी एक्स्प्रेसला सकाळी साडे आठच्या सुमाराला हा अपघात झाला. उत्तर प्रदेशात रेल्वे रुळांवर घातपाताचे प्रकार खूप वाढले आहेत. यामागे पाकच्या आयएसआयचा हात आहे, असा जाहीर आरोप खुद्द मोदींनी केला होता. आजचा अपघातही घातपात आहे की काय, अशा शंकेला वाव आहे. सुरेश प्रभूंनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2017 03:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...