वायुदलाला मिळाले जगातले सर्वात शक्तीशाली 8 'अपाचे हेलिकॉप्टर', पाकिस्तान सीमेवर करणार तैनात!

वायुदलाला मिळाले जगातले सर्वात शक्तीशाली 8 'अपाचे हेलिकॉप्टर', पाकिस्तान सीमेवर करणार तैनात!

जेव्हा जगातील सर्वात धोकादायक हल्ल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरचा प्रश्न येतो तेव्हा अमेरिकेच्या अपाचे हेलिकॉप्टरचे नाव सर्वात आधी येतं.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : अमेरिकी बनावटीचे 'अपाचे हेलिकॉप्टर' आज सेवेत दाखल झालं आहे. मंगळवारी पठाणकोट वायू तळावर वायुदल प्रमुखांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 2015मध्ये याबाबत अमेरिका आणि भारतात करार झाला होता. अशी एकूण 22 चॉपर्स भारताला मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय वायुदलाची शक्ती आता वाढणार आहे. याला 'मल्टी रोल कोंबट हेलिकॉप्टर' असंही म्हणतात आणि या श्रेणीतलं हे जगातलं सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. अमेरिकन लष्कर आणि वायुदलही याचा भरपूर वापर करतात.

जेव्हा जगातील सर्वात धोकादायक हल्ल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरचा प्रश्न येतो तेव्हा अमेरिकेच्या अपाचे हेलिकॉप्टरचे नाव सर्वात आधी येतं. हे शक्तिशाली हेलिकॉप्टर आज भारतीय हवाई दलात अधिकृतपणे सामील झालं आहे. पठाणकोट हवाई तळावर निवृत्ती घेण्यापूर्वी भारतीय हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ हे भारतीय हवाई दलात जगातील सर्वात शक्तीशाली हेलिकॉप्टर सामील करणार आहेत.

ग्रुप कॅप्टन एम शयलू सांभाळणार...

हल्ला करणारं हे हेलिकॉप्टर तीन दशकांहून अधिक काळातील MI 35  हेलिकॉप्टरची जागा घेणार आहे. पहिला अपाचे स्क्वॉडर्न ग्रुप कॅप्टन एम शयलूच्या यांच्याकडे असणार आहे. यापूर्वी ते कार निकोबार इथल्या MI-17 V5  हेलिकॉप्टर युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते. ज्यांनी अपाचे हेलिकॉप्टरवर सखोल प्रशिक्षण घेतलं आहे. या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे शत्रूच्या घरात घुसण्याची भारताची क्षमता आणखी वाढली आहे.

इतर बातम्या - उरण ONGC प्लांटमध्ये भीषण आग, दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू

काय आहे विशेष...!

- हल्ल्याचं कोणतंही हेलिकॉप्टर शक्तीशाली असतं. त्यामध्ये शस्त्रे असतात. टू सीटर अपाचे अ‍ॅटॅक हेलिकॉप्टरमध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर क्षेपणास्त्र आणि प्रत्येक बाजूला दोन 30 मिमी बंदुका आहेत.

- या हेलिकॉप्टरची खास गोष्ट म्हणजे दिवसाप्रमाणे रात्रीच्या वेळीदेखील आपलं काम चांगल्या प्रकारे करू शकतं.

- या हेलिकॉप्टरसमोर एक सेन्सर बसवण्यात आला आहे. जो रात्री ऑपरेशन करण्यास मदत करेल.

इतर बातम्या - हिमेश रेशमियानं शेअर केला रानू मंडलच्या तिसऱ्या गाण्याचा VIDEO

- अपाचे प्रति तास 365 किमी वेगाने उड्डाण करू शकतं आणि शत्रूच्या घरात जाऊन सहजपणे नष्ट करू शकतो.

- अपाचे हेलिकॉप्टरमध्ये काही वैशिष्ट्यं आहेत जी हल्ल्याच्या उर्वरित हेलिकॉप्टरपेक्षा वेगळी आहेत. यात त्याचे हेल्मेट माउंटेड डिस्प्ले सर्वात महत्वाचा आहे. ज्याच्या मदतीने हेलिकॉप्टरमधला पायलट सहजपणे शत्रूला लक्ष्य बनवू शकतो.

VIDEO: दिल्लीत चार मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

Published by: Renuka Dhaybar
First published: September 3, 2019, 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading