S M L

इजिप्त दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या 235वर, बॉम्बस्फोटानंतर इजिप्तमध्ये हाय अलर्ट

इजिप्तमधील उत्तर सिन्नई भागात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या आता 235 वर पोहोचलीय. या बॉम्बहल्ल्यात 130 जखमीही झालेत. एका मशिदी शेजारी दहशतवाद्यांनी हा बॉम्बहल्ला आणि बेछूट गोळीबार केलाय. काल शुक्रवार असल्याने नमाज सुरू असतानाच हा आतंकवादी झाल्याने मृतांच्या संख्येत वाढ झालीय.

Chandrakant Funde | Updated On: Nov 25, 2017 09:51 AM IST

इजिप्त दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या 235वर, बॉम्बस्फोटानंतर इजिप्तमध्ये हाय अलर्ट

25 नोव्हेंबर, कैरो : इजिप्तमधील उत्तर सिन्नई भागात काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या आता 235 वर पोहोचलीय. या बॉम्बहल्ल्यात 130 जखमीही झालेत. एका मशिदी शेजारी दहशतवाद्यांनी हा बॉम्बहल्ला आणि बेछूट गोळीबार केलाय. काल शुक्रवार असल्याने नमाज सुरू असतानाच हा आतंकवादी झाल्याने मृतांच्या संख्येत वाढ झालीय.

अलआरिशमधील अल रॉवडा शहरातील एका मशिदीच्या परिसरात हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलाय. या बॉम्बस्फोटानंतर काही अज्ञात हल्लेखोरांनी नमाजासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांवर बेछूट गोळीबारही केल्याचं प्रत्यश्रदर्शींनी सांगितलं. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवाद्यांनी जबाबदारी स्वीकारलेली नाही. या हल्ल्यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलंय. तसंच संपूर्ण इजिप्तमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलंय.

2011 आणि 2013मध्येही इजिप्तमध्ये अशाचपद्धतीचे आतंकवादी हल्ले झाले होते. त्यात जवळपास 700 सुरक्षारक्षक मारले गेले होते. आजच्या हल्ल्यातही प्रामुख्याने सुरक्षारक्षकांनाच लक्ष्य केलं गेल्याचं घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close