इजिप्तमध्ये मशिदीजवळ अतिरेकी हल्ला ; बॉम्बस्फोट आणि गोळीबारात 184 ठार तर 125 जखमी

इजिप्तमधील उत्तर भागात एका मशिदी शेजारी दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला आणि बेछूट गोळीबार केलाय. त्यात 184 लोक जागीच ठार तर 125 जण जखमी झालेत. शुक्रवारची नमाज सुरू असतानाच हा आतंकवादी झाल्याने घटनास्थळी बराचकाळ घबराटीचं वातावरण होतं.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Nov 24, 2017 08:45 PM IST

इजिप्तमध्ये मशिदीजवळ अतिरेकी हल्ला ; बॉम्बस्फोट आणि गोळीबारात 184 ठार तर 125 जखमी

24 नोव्हेंबर, कैरो : इजिप्तमधील उत्तर सिन्नई भागातल्या एका मशिदी शेजारी दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला आणि बेछूट गोळीबार केलाय. त्यात 184 लोक जागीच ठार तर 125 जण जखमी झालेत. शुक्रवारची नमाज सुरू असतानाच हा आतंकवादी झाल्याने घटनास्थळी बराचकाळ घबराटीचं वातावरण होतं.

अलआरिशमधील अल रॉवडा शहरातील एका मशिदीच्या परिसरात हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलाय. या बॉम्बस्फोटानंतर काही अज्ञात हल्लेखोरांनी नमाजासाठी आलेल्या मुस्लीम बांधवांवर बेछूट गोळीबारही केल्याचं प्रत्यश्रदर्शींनी सांगितलं. या हल्ल्याची अद्याप कोणत्याही दहशतवाद्यांनी जबाबदारी स्वीकारलेली नाही. या हल्ल्यानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलंय. तसंच संपूर्ण इजिप्तमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आलंय.

Loading...

2011 आणि 2013मध्येही इजिप्तमध्ये अशाचपद्धतीचे आतंकवादी हल्ले झाले होते. त्यात जवळपास 700 सुरक्षारक्षक मारले गेले होते. आजच्या हल्ल्यातही प्रामुख्याने सुरक्षारक्षकांनाच लक्ष्य केलं गेल्याचं घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 08:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...