जीएसटीमुळे प्रेमही महागणार!

जीएसटीमुळे प्रेमही महागणार!

तुमचा खिसा आता जास्त रिकामा होणार आहे. कारण आता साधा कर नाही तर 'जीएसटी' लागणार आहे.

  • Share this:

03जुलै : तुम्ही जर आता प्रेमात आहात का? आपल्या पार्टनरला डेटवर घेऊन जाणार आहात का? तर जरा सांभाळून. तुमचा खिसा आता जास्त रिकामा होणार आहे. कारण आता साधा कर नाही तर 'जीएसटी' लागणार आहे. चला तर तुमच्या डेटच्या खर्चावर जीएसटीचा कसा परिणाम होणार आहे हे जाणून घेऊ या.

1.डिनर डेट- जर तुम्ही डिनर डेटला जात असाल तर एसी रेस्टॉरंटमध्ये 18टक्के टॅक्स बसणार आहे. जर नॉन एसीमध्ये घेऊन जाणार असाल तर 12टक्के टॅक्स लागेल. आणि जर फाइव्ह स्टार हॉटेलात जाणार असाल तर तब्बल 28टक्के टॅक्स बसेल. त्यात तुम्ही जर दारू पिणार असाल तर तुमचा दारूवर होणारा खर्च दारू कुठे पिता यावर अवलंबून असेल.त्यामुळे डिनर डेट चांगलीच महागात पडणार आहे.

2. मुव्ही- जर तुम्ही मुव्हीला जाणार असा तर हा खर्च खूपच वाढणार आहे .कारण मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघण्यावर 28 टक्के टॅक्स लागेल. आता जर तुम्ही 100 रूपयांपर्यंत तिकीट असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये जाणार असाल तर तिथेही 18 टक्के टॅक्स लागू होणार आहे.

3. लॉंग ड्राइव्ह- लाँग ड्राइव्हला जाणार असाल तर कॅबमधून फिरण्यावरही 5टक्के जीएसटी बसणार आहे. जर ट्रीपला जायचा विचार करत असाल तर विमान रेल्वे दोन्हीकडे जीएसटीमुळे तिकीटांचे दर वाढणार आहेत.

त्यामुळे गालिबच्या 'ये इश्क नही आसान' या वाक्याची आता आठवण झाल्याशिवाय राहत नाही .

First published: July 3, 2017, 4:34 PM IST

ताज्या बातम्या