S M L

नीरव मोदीच्या गीतांजली शोरूममधून 5,100 कोटींचे हिरे 'ईडी'कडून जप्त !

पीएनबी घोटाळ्यात आज सकाळपासून डायमंड किंग नीरव मोदींच्या विविध शोरूमवर टाकलेल्या धाडीत तब्बल 5,100 कोटींचे हिरे, जडजवाहीर ईडीने हस्तगत केलेत. नीरव मोदीने पीएनबी बँकेला लेटर ऑफ अंडरटेकिंग घोटाळ्यात तब्बल 11,500 कोटींचा चुना लावल्याचं लक्षात येताच ईडीने त्याच्या देशभरातील 17 मालमत्तांवर छापे टाकलेत.

Chandrakant Funde | Updated On: Feb 16, 2018 01:12 PM IST

नीरव मोदीच्या गीतांजली शोरूममधून 5,100 कोटींचे हिरे 'ईडी'कडून जप्त !

15 फेब्रुवारी, मुंबई : पीएनबी घोटाळ्यात आज सकाळपासून डायमंड किंग नीरव मोदींच्या विविध शोरूमवर टाकलेल्या धाडीत तब्बल 5,100 कोटींचे हिरे, जडजवाहीर ईडीने हस्तगत केलेत. नीरव मोदीने पीएनबी बँकेला लेटर ऑफ अंडरटेकिंग घोटाळ्यात तब्बल 11,500 कोटींचा चुना लावल्याचं लक्षात येताच ईडीने त्याच्या देशभरातील 17 मालमत्तांवर छापे टाकलेत. या धडक कारवाईत मोदीच्या मालकीच्या गितांजली जेम्स या दागिन्यांच्या शोरूममधून तब्बल ५१०० कोटी रुपयांचे हिरे जडजवाहीर आणि दागिने हस्तगत केलेत. त्यासोबतच मोदीच्या बँक खात्यातील ३.९ कोटींच्या ठेवी आणि मुदत ठेवी देखील ईडीने जप्त केल्या आहेत.

त्याचबरोबर येथे आढळून आलेले रेकॉर्ड्स आणि कागदपत्रे पुढील तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत.

नीरव मोदीच्या मुंबई, सुरत आणि नवी दिल्लीतील कार्यालये, शोरुम्स आणि वर्कशॉप्सवर ईडीने छापे मारले आहेत. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारत डायमंड बॉर्समधील फायरस्टार डायमंड प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्यालय, कुर्ला पश्चिममधील कोहिनूर सीटीमधील मोदीचे खासगी कार्यालय, शारुम्स तसेच दक्षिण मुंबईतील फोर्ट येथील इट्स हाऊस येथील बुटीक आणि लोअर परळ येथील पेनिंसुला बिझनेस पार्कमधील वर्कशॉपवरही ईडीने छापे मारून तेथील मालमत्ता जप्त केली आहे.

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2018 09:27 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close