पी. चिदम्बरम यांच्या मुलाच्या मालमत्तेवर 'ईडी'चे पुन्हा छापे

पी. चिदम्बरम यांच्या मुलाच्या मालमत्तेवर 'ईडी'चे पुन्हा छापे

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित असणा-या संपत्तीवर अंमलबाजवणी संचालनालयाने अर्थाने ईडीने पुन्हा छापे टाकले आहेत. कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईमधील ठिकाणावंर आज सकाळी हे छापे टाकण्यात आलेत.

  • Share this:

13 जानेवारी, नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित असणा-या संपत्तीवर अंमलबाजवणी संचालनालयाने अर्थाने ईडीने पुन्हा छापे टाकले आहेत. कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईमधील ठिकाणावंर आज सकाळी हे छापे टाकण्यात आलेत. हे छापे एअरसेल-मॅक्सीस प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या संबंधातील आहेत. 1 डिसेंबर रोजीसुद्धा अशाच प्रकारचा तपास करण्यात आला होता.

मनी लाँड्रिंग प्रकरणी गैरहजर राहिल्याने गुरुवारी ईडीने कार्ती चिदंबरमविरोधात समन्स जारी केला होता. आता त्यांना 16 जानेवारीला हजर राहण्याचा आदेश देण्यता आला आहे. याआधी त्यांना गुरुवारी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं, मात्र ते गैरहजर राहिले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जातंय. एअरसेल-मॅक्सीसला परवाना मिळवून देताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. ईडीने यापूर्वीच याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतलाय. दरम्यान, पी. चिदम्बरम यांनीही या कारवाईली दुजोरा दिलाय.

 

First published: January 13, 2018, 12:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading