मी पैसे परत करत होतो पण ईडीने आडकाठी आणली,मल्ल्याचा अजब दावा

मी पैसे परत करत होतो पण ईडीने आडकाठी आणली,मल्ल्याचा अजब दावा

देशभरातल्या बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याच्या वकिलानं आज मुंबई न्यायालयात अजब दावा केलाय

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : देशभरातल्या बँकांचं जवळपास 9 हजार कोटींचं कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याच्या वकिलानं आज मुंबई न्यायालयात अजब दावा केलाय. ईडी म्हणजेच सक्तवसुली संचलनालयाच्या असहकार्यामुळं कर्जफेडीची प्रक्रिया रोखली असा दावा विजय मल्ल्याच्या वकिलानं मुंबईतल्या पीएमएलए कोर्टात केलाय.

विजय मल्ल्या सध्या लंदनमध्ये वास्तव्यास आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी वेस्टमिंस्टर कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज मुंबईतील पीएमएलए कोर्टात मल्ल्याच्या वकिलांनी भलताचा दावा केला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून आम्ही वेळोवेळी पैसे देण्याचा प्रयत्न केला. पण ईडीने मदत करण्याऐवजी अडकाठी आणली असा आरोपच मल्ल्याच्या वकिलांनी केला.

मध्यंतरी विजय मल्ल्याने लंडनमधील कोर्टाबाहेर धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. देश सोडण्यापूर्वी मी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटलो असा खळबळजनक खुलासा विजय मल्ल्याने केला होता. तसंच तडजोडीचा प्रस्ताव दिला होता पण त्यावर काही तोडगा निघाला नाही असा दावाही मल्ल्याने केला.

मात्र, अरुण जेटली यांनी विजय मल्ल्याचा दावा खोडून काढलाय. विजय मल्ल्याचं वक्तव्य धादांत खोटं आणि बिनबुडाचं आहे, माझी अशी कोणतीही भेट झाली नव्हती असा दावा जेटलींनी केला होता.

==============================================

VIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2018 10:37 PM IST

ताज्या बातम्या