कोल्हापूर, संदीप राजगोळकर, 20 जून : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ईडीनं 4 ठिकाणी छापेमारी केली. बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर ही छापेमारी करण्यात आली आहे. ईडीनं केलेल्या छापेमारीचं कारण हे बेहिशेबी मालमत्ता आणि कर चुकवेगिरी असल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरसह इचलकरंजी आणि जयसिंगपूरमध्ये ईडीनं छापे मारले. यावेळी कारवाईबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. कोल्हापूरमध्ये ईडीच्या दोन पथकांनी ही कारवाई केली. या कारवाईबाबत सध्या कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. छापेमारी करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे अद्याप तरी समोर आलेली नाहीत.
ईडीची कारवाई
ईडीनं आता काळा पैसा, कर बुडवणाऱ्यांविरोधात आता सक्त कारवाई करायला सुरूवात केली आहे. यापूर्वी देशासह राज्यात देखील ईडीनं अनेक ठिकाणी कारवाई केली आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यापूर्वीच ब्लॅकमनीविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे.
खुशखबर! येत्या 48 तासांत राज्यात मान्सून दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज