Home /News /news /

नीरव मोदीला EDचा दणका, जप्त केलेली 329 कोटींची संपत्ती पाहून बसेल धक्का

नीरव मोदीला EDचा दणका, जप्त केलेली 329 कोटींची संपत्ती पाहून बसेल धक्का

जून महिन्यात नीरव मोदी आणि मेहूल चोकसी या दोघांचा 1,350 कोटींचा खजिना भारतात आणण्यात EDला यश मिळालं होतं.

    नवी दिल्ली 8 जुलै: देशातल्या बँकांचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदीला (Nirav Modi)  EDने आणखी एक दणका दिला आहे. (Enforcement Directorate-ED) आर्थिक गुन्ह्याचा आरोप असल्याने त्याची 329.66 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आल्याची माहिती EDने दिली आहे. जून महिन्यातच कोर्टाने मोदीची सर्व संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याची सर्व संपत्ती भारत सरकारच्या मालकीची झाली आहे. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये मुंबईत 4 फ्लॅट्स, अलीबागमधली जमीन, एक फार्महाउस, लंडन आणि UAE मधला फ्लॅट, राजस्थानातल्या  जैसलमेरमधली पवनचक्की त्याचबरोबर बँकामधली रोख आणि शेअर्सचाही समावेश आहे. या आधीही त्याची संपत्ती जप्त करण्यात आली होती. जून महिन्यात नीरव मोदी आणि मेहूल चोकसी या दोघांचा खजिना आता EDच्या ताब्यात आला आहे. हिरे, माणिक, मोती, पाचू अशी 1,350 कोटींची बहुमूल्य रत्ने EDने हाँगकाँगहून भारतात आणली आहेत. मोदी आणि चोकसीच्या फर्मचा हा खजिना असून 108 पेट्यांमध्ये तो खजिना भारतात आणण्यात आला आहे. लबाड पाकिस्तानची नवी खेळी, वाचा काय म्हणाले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या दोघांनाही भारतात आणण्यासाठी ED प्रयत्न करत असून त्यात मोठी प्रगतीही झाली आहे. हे दोघही पंजाब नॅशनल बँकेची 14 हजार कोटी बुडवून विदेशात पळाले आहेत. नीरव मोदी ला सोमवारी (8 जून) (Nirav Modi) ला कोर्टाने मोठा झटका दिला होता. त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. भयानक! कार चालवताना ब्रेकजवळ बसला होता सगळ्यात विषारी साप, पुढे झालं असं... नीरव मोदीवर मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत खटला चालवला जात होता. त्यावर आज पीएमएलए कोर्टाने नीरव मोदीची सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आता नीरवच्या सर्व मालमत्तेवर भारत सरकारचा (Indian Government) अधिकार असणार आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या