Home /News /news /

BREAKING : गुजरात हादरलं, 2001च्या भीतीने लोक घराबाहेर धावले

BREAKING : गुजरात हादरलं, 2001च्या भीतीने लोक घराबाहेर धावले

5.8 अशी रिश्टर स्केलवर भूकंपाची पातळी दर्शवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं (एनसीएस) यासंबंधी माहिती दिली आहे.

    गांधीनगर, 14 जून : देशात कोरोनाचा हाहाकार माजला असताना गुजरातच्या राजकोटपासून 122 किमी अंतरावर भूकंपाचे मोठे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. 5.8 अशी रिश्टर स्केलवर भूकंपाची पातळी दर्शवण्यात आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं (एनसीएस) यासंबंधी माहिती दिली आहे. याआधीही 6 जून रोजी बनासकांठा जिल्ह्यासह उत्तर गुजरातमधील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. तब्बल 10 सेकंदांपर्यंत पृथ्वी हादरली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. त्यावेळी रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 8.8 इतकी मोजली गेली होती. 26 जानेवारी 2001 मध्ये गुजरातच्या भूजमध्ये मोठा भूकंप झाला होता. यामध्ये तब्बल 13 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच भीतीने सध्या गुजरात हादरलं आहे. बनासकंठातील पालनपूर, दाटा, अंबाजी, अमीरगड, माउंट आबू, डीसासह साबरकांठामधील हिमाटनगर, मोडसा, बयाड, खेडब्रह्मा, विजयनगरसह उत्तर गुजरातमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या हादऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या