नवी दिल्ली, 18 जून : मिझोराममध्ये (Mizoram) गुरुवारी संध्याकाळी भूकंपाचे (Earthquake)तीव्र धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. रिश्टर स्केलवर 5.0 अशी भूकंपाची तीव्रता होती. या भूकंपाचे केंद्र मिझोराममधील चंपाईपासून (Champhai) 98 किमी दक्षिणपूर्व इथं होतं. तर या धक्क्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, गुरुवारी न्यूझीलंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.4 नोंदविली गेली आहे. अमेरिकन भूशास्त्रीय सर्वेक्षणानुसार त्याचं केंद्र ईशान्य न्यूझीलंडमधील केर्माडेक बेटावरील ओपिटिकी इथे जमिनीपासून 33 किलोमीटर खाली आहे.
खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासून देशातील अनेक ठिकाणी दररोज भूकंप धक्के बसत आहेत. यामुळे वैज्ञानिकही आश्चर्यचकित आहेत. मागील दोन महिन्यांत 12 वेळा दिल्ली, मुंबई, जम्मू-काश्मीर आणि गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. याधाही भूकंपांच्या अनेक घटना घडल्या. पण गुजरातमधला 5.5 तीव्रतेचा पहिला भूकंप वगळता हे सर्व भूकंप सौम्य तीव्रतेचे असल्याचं सांगण्यात येत आहे. मुंबईतही बुधवारी रिश्टर स्केलवर 2.5 तीव्रतेचा भूकंप जाणवला होता. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा मुंबईपासून 103 किमी उत्तरेस होता.
रुग्णवाढीचा दर मंदावल्याचा सरकारचा दावा; तरी दिवसभरात 3752 रुग्ण
जम्मू-काश्मीरमध्ये अनेक वेळा झाला भूकंप
मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हा भूकंप दुपारी 2.10 वाजता आला असल्याचं नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीकडून सांगण्यात आलं आहे. रिश्टर स्केलमध्ये या भूकंपाची तीव्रता 9.9 इतकी होती. तर भूकंपाचं केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील कटराच्या पूर्वेस 85 कि.मी. अंतरावर होतं.
धक्कादायक! भिंत अंगावर कोसळून दोन चिमुकल्या मुलींचा जागीच मृत्यू
एका दिवसात दोनदा भूकंप
याआधीही मंगळवारी जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी मध्यम तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. 5.8 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. यावेळी सुदैवाने कोणतंही नुकसान झालं नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप सकाळी सात वाजता आला आणि त्याचं केंद्र ताजिकिस्तान होतं. श्रीनगर, किश्तवाड आणि डोडा जिल्ह्यांसह काश्मीर खोऱ्यातील बहुतेक भागात याचा परिणाम जाणवला.
'तो' अंतिम वर्ल्डकप सामना होता फिक्स; श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांचा दावा
संपादन - रेणुका धायबर