दिल्ली आणि उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के

दिल्ली आणि उत्तर भारताला आज रात्री साडे आठच्या सुमाराला भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5 ते 5.5 इतकी नोंदवली गेलीय. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग परिसरात जमिनीखाली 30 किमी अंतरावर दाखवत असल्याचं आयएमडीने सांगितलंय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 6, 2017 09:23 PM IST

दिल्ली आणि उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र धक्के

06 डिसेंबर, नवी दिल्ली : दिल्ली आणि उत्तर भारताला आज रात्री साडे आठच्या सुमाराला भूकंपाचे तीव्र धक्के बसलेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5 ते 5.5 इतकी नोंदवली गेलीय. या भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग परिसरात जमिनीखाली 30 किमी अंतरावर दाखवत असल्याचं आयएमडीने सांगितलंय.

उत्तराखंडमधील चमोली, अल्मोडा, रुद्रप्रयाग, पौडी आणि गढवाल जिल्ह्यात या भूकंपामुळे जमिनीला तीव्र हादरे बसलेत. इकडे दिल्लीतही एनसीआरमध्ये भूकंपामुळे काही इमारतींना हादरे जानवल्याने लोकं इमारतींमधून तात्काळ बाहेर पळू लागले होते. या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये नेमकी काय हानी झालीय, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 09:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...