मुंबईतही तासाभरासाठी 'बत्ती गूल' !

मुंबईतही तासाभरासाठी 'बत्ती गूल' !

  • Share this:

24 मार्च : जगभरात आज दिवे बंद ठेवून अर्थ अवर पाळण्यात आला. वातावरणातील बदलांविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी जगभर 'अर्थ अवर' आयोजित केलं गेलंय.

पृथ्वीच्या संरक्षणाविषयी लोकांमध्ये संवेदनशीलता वाढवण्याच्या उद्देशानं सुरु झालेल्या 'अर्थ अवर'मध्ये आता भारतीयही सहभागी झाले होते. मुंबईसह अन्य शहरांमध्येही बत्ती गूल करून हा अर्थ अवर पाळण्यात आला. 8.30 वाजता जगभरात तासाभरासाठी दिवे बंद ठेवून अर्थ अवर साजरा करण्यात आला.

अर्थ अवरची सुरुवात वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने केली. जगात पहिल्यांदा २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात अर्थ अवर साजरा झाला. नागरिकांना आवाहन करून तासभरासाठी दिवे बंद केले गेले. हळूहळू जागरणाची ही लाट जगभर पसरली. जगभर पृथ्वीच्या पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता आणण्यासाठी तासभर बत्ती बंद करण्याची सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही अर्थ अवरसाठी अंधार केला जाऊ लागलाय. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मरिन ड्राईव्हवरील इमारतींचे दिवे तसंच गेट वे ऑफ इंडियावरील दिवे बंद करण्यात आले होते.

First published: March 24, 2018, 10:35 PM IST

ताज्या बातम्या