फक्त 25 हजार रुपयांची गुंतवणूक करून सुरू करा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला कमवा 40 हजार रुपये

फक्त 25 हजार रुपयांची गुंतवणूक करून सुरू करा 'हा' व्यवसाय, दर महिन्याला कमवा 40 हजार रुपये

देशांत आता अनेक राज्यांमध्ये प्लास्टिकवर बंदी आहे. त्यामुळे या वस्तूंची मागणी वाढतेय.

  • Share this:

मुंबई, 11 एप्रिल :तुम्हाला कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करायचाय? मग जूटची बॅग हा चांगला पर्याय आहे. देशांत आता अनेक राज्यांमध्ये प्लास्टिकवर बंदी आहे. त्यामुळे जूटच्या बॅगेला वाढती मागणी आहे. तेव्हा तुम्ही कमी पैशांमध्ये जूटच्या बॅगा तयार करू शकता. जाणून घेऊ  हा व्यवसाय कसा करायचा ते.

युनिट सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक? - वस्त्रोद्योग मंत्रालयातल्या हॅण्डिक्राफ्ट डिव्हिजनच्या माहितीप्रमाणे, तुम्हाला जूट बॅग बनवण्याचं युनिट सुरू करायचं असेल तर तुम्हाला 5 शिवण मशीन्स खरेदी कराव्या लागतील. त्यात 2 हेवी ड्युटी हव्यात. या मशिन्ससाठी तुम्हाला जवळजवळ 90 हजार रुपये खर्च येईल. याशिवाय तुम्हाला 1 लाख 4 हजार रुपये वर्किंग कॅपिटलची गरज आहे. इतर खर्चात फिक्स्ड अ‍ॅसेट, आॅपरेटिंग खर्च इत्यादींसाठी 58 हजार रुपये खर्च येईल. म्हणजे तुमच्या प्रोजेक्टसाठी जवळजवळ 2.52 लाख रुपये भांडवलाची गरज आहे.

या भांडवलावर तुम्हाला बँकेचं कर्ज मिळेल. यात एक महिन्याचा कच्चा माल, एक महिन्याचा पगार यांचा समावेश असतो. या प्रोजेक्टसाठी तुम्ही 65 टक्के पैशाच्या रुपातलं कर्ज आणि 25 टक्के व्याज मुक्त कर्ज नॅशनल सेंटर फाॅर जूट डायव्हर्फिकेशन NCFD कडून घेऊ शकता. उरलेल्या 25 हजार रुपयांची तुम्हाला स्वत: सोय करावी लागेल. तेवढ्या पैशात तुम्ही काम करू शकता.

किती होणार उत्पादन? - तुम्ही या प्रोजेक्टच्या आधारे युनिट सुरू केलं तर तुम्ही 9 हजार शाॅपिंग बॅग्ज, 6 हजार लेडीज बॅग्ज, 7500 स्कूल बॅग्ज, 9 हजार जेंट्स हॅण्ड बॅग्ज, 6 हजार जूट बाम्बू फोल्डर दरवर्षी बनवू शकता.

किती होईल कमाई? - तुम्हाला वर्षभरात कच्चा माल, पगार, भाडं, डेप्रिसिएशन, बँकेचं कर्ज सर्व पकडून जवळजवळ 27. 95 लाख रुपये खर्च येईल. सेल्स रिव्हेन्यू 32.25 लाख रुपये असेल. अशा प्रकारे तुमचा वर्षभराचा नफा जवळजवळ 4.30 लाख रुपये होईल. म्हणजे वर्षाला जवळजवळ 36 हजार रुपये.

VIDEO: नितीन गडकरींनी मतदानानंतर दिली 'ही' प्रतिक्रिया

First published: April 11, 2019, 12:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading