एकनाथ खडसेंसाठी भाजप म्हणजे, जीना यहाँ, मरना यहाँ! - मुनगंटीवार

एकनाथ खडसेंसाठी भाजप म्हणजे, जीना यहाँ, मरना यहाँ! - मुनगंटीवार

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला वाढवण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले, पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्यामुळं ते पक्ष कधीच सोडणार नाहीत.

  • Share this:

नाशिक, ता.15 जून : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला वाढवण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतले, पक्षासाठी खस्ता खाल्ल्या त्यामुळं ते पक्ष कधीच सोडणार नाहीत. त्यांच्यासाठी भाजप म्हणजे जीना यहाँ, मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ असं आहे अशी मार्मिक टिप्पणीही त्यांनी केली.

एकनाथ खडसे यांनी ओबीसीचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळांना समर्थन दिलं होतं. त्यामुळं खडसे काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लगालं आहे. त्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी केलेली टिप्पणी महत्वाची मानली जाते.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. त्यामुळं ओबीसी नेत्यांवरच्या अन्यायाचा मुद्दा गैरलागू ठरतो. खडसेंची नाराजी असेल तर आम्ही ती दूर करू. पक्षाला नुकसान होईल असा कुठलाही निर्णय ते घेणार नाहीत असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.

...तर भुजबळांसोबत एकत्र येईल-एकनाथ खडसे

छगन भुजबळांचं नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन!

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता. चौकशी समितीनं पुण्याच्या जमिन घोटाळ्याप्रकरणी खडसेंना क्लिन चीट दिली होती. त्यानंतर खडसेंची मंत्रिमंडळात वर्णी लागेल असं बोललं जात होतं.

मात्र प्रकरण न्यायालयात आहे आणि त्यातून खडसे निर्दोष सुटतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करत खडसेंचा मार्ग अजून खडतरच असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळं एकनाथ खडसे नाराज आहेत. अनेकदा त्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला लक्ष्य केल्याने खडसे बंडाच्या पावित्र्यात आहेत असेही संकेत दिले गेले त्यामुळं निवडणूका जवळ येत असताना ते कुठली भूमिका घेतात हे महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा...

ऑफिसात पोहोचण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरची बंगळूरात घोड्यावरून स्वारी!

60 तासांच्या मॅरेथाॅन नाट्य संमेलनाची आज सांगता

नक्षलवाद्यांच्या समर्थनाचा आरोप, प्रा. शोमा सेन नागपूर विद्यापीठातून निलंबित

 

First published: June 15, 2018, 7:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading