पक्षातलेच काही लोक कृतघ्न निघाले, पक्ष घेईल तो निर्णय मान्य – खडसे

पक्षातलेच काही लोक कृतघ्न निघाले, पक्ष घेईल तो निर्णय मान्य – खडसे

गेल्या दोन वर्षात आपल्याच माणसांची खरी ओळख झाली. ज्यांना बोट धरून मोठं केलं तीच माणसं कृतघ्न निघाली अशी खंत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलीय.

  • Share this:

मुंबई,ता.01 एप्रिल : गेल्या दोन वर्षात आपल्याच माणसांची खरी ओळख झाली. ज्यांना बोट धरून मोठं केलं तीच माणसं कृतघ्न निघाली अशी खंत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केलीय.

भ्रष्टाचाराचे सर्व आरोप हे जाणीवपूर्वक आणि सूडापोटीच करण्यात आले होते असा आरोपही त्यांनी अंजली दमानियांचं नाव न घेता केला. कुठलेही पुरावे नसताना केवळ बदनाम करण्यासाठीच हे कुभांड रचण्यात आलं होतं. गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात आहे. पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, तुरूंगवास भोगला, कार्यकर्ते घडवले एवढं काम असताना बिनबुडांच्या आरोपांनी राजकीय जीवन उद्धवस्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही म्हणाले.

सततच्या आरोपांना कंटाळून मीच राजीनामा दिला होता, पक्षाने मला सांगितलं नव्हतं. पक्ष आपल्या कायम पाठिशी राहिला. पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्याला पाठिशी राहणार असल्याचं सांगितलं होत. आता न्यायालयातही आपण निर्दोष ठरू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निर्दोष सुटल्यानंतर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2018 06:46 PM IST

ताज्या बातम्या