News18 Lokmat

राज्यातल्या मंत्र्यानेच रचला माझ्याविरूद्ध कट - खडसेंचा गंभीर आरोप

राज्य सरकारमधल्या मंत्र्यानेच कटकारस्थान रचत मला बदनाम केलं असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2018 08:02 PM IST

राज्यातल्या मंत्र्यानेच रचला माझ्याविरूद्ध कट - खडसेंचा गंभीर आरोप

सागर वैद्य, नवी दिल्ली, ता.15 जून : राज्य सरकारमधल्या मंत्र्यानेच कटकारस्थान रचत मला बदनाम केलं असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. अंजली दमानिया यांच्याशी संगनमत करून माझ्याविरूद्ध बदनामीची मोहिम राबवण्याचा कट रचण्यात आला होता.

त्याविरूद्ध मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत निवेदन दिलं असल्याचंही खडसे यांनी सांगितलं.राजधानी नवी दिल्लीत आलेल्या खडसे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना हे गंभीर आरोप केलेत.

कुठे शिजला कट?

दोन वर्षांपूर्वी अजंली दमानिया यांच्या घरी झालेल्या बैठकीत बदनामिचा कट रचला होता असं सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी जाहीर केलं होतं. खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडायचं असा तो कट होता आणि त्याच प्रमाणे सर्व घडत गेलं. त्यामुळं माझा त्याच्यावर विश्वास बसला असं खडसे म्हणाले.

ओबीसी चळवळ संपवण्याचा डाव

Loading...

राज्यातल्या ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं जात असून ओबीसी चळवळ संपवण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, एकनाथ खडसे या सर्व ओबीसी नेत्यांना टार्गेट केलं गेलं. हा ओबीसी चळवळ संपवण्याचा डाव आहे. आम्हीच सत्तेत राहिलो नाही तर ओबीसींचे प्रश्न मांडणार कोण असा सवालही त्यांनी केला.

पक्षासाठी झिजलो पण कदर झाली नाही

गेली 40 वर्ष भाजपसाठी झिजलो, खस्ता खाल्ल्या, उपाशीपोटी राहिलो, पदाची अपेक्षा बाळगली नाही मात्र खोटे नाटे आरोप झाल्यावर माझ्याविरूद्ध चौकशीचा ससेमीरा लावला गेला. दोन वर्ष अपमानास्पद वागणूक मिळाली मंत्रिमंडळातून जावं लागलं याची खंत असल्याचं सलही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली. मंत्रिमंडळात घेतलं तर ठिक नाही घेतलं तरही त्याचं काही वाटणार नाही असंही ते म्हणाले.

हेही वाचा...

एकनाथ खडसेंसाठी भाजप म्हणजे, जीना यहाँ, मरना यहाँ! - मुनगंटीवार

राज्यात दंगली घडाव्यात हेच सरकारला हवंय-प्रकाश आंबेडकर

नक्षलवाद्यांच्या समर्थनाचा आरोप, प्रा. शोमा सेन नागपूर विद्यापीठातून निलंबित

भय्यूजी महाराज आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांची चौकशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 15, 2018 08:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...