नवरा घरी असतानाही बोलवण्यासाठी आला प्रियकर, पतीने कात्री खुपसून केली हत्या!

नवरा घरी असतानाही बोलवण्यासाठी आला प्रियकर, पतीने कात्री खुपसून केली हत्या!

प्रियकर हा त्याच्या पत्नीलासोबत घेऊन जाण्याबाबत हट्ट धरत होता. यावरून पती भडकला आणि त्याने रागात कात्रीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली.

  • Share this:

छत्तीसगड, 08 सप्टेंबर : प्रेम प्रकरणातून गुन्हा होण्याचं प्रमाण सध्या वाढलं आहे. गुन्ह्याचा असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रियकराची प्रेयसीच्या पतीने हत्या केली आहे. कात्रीने सपासप वार करून प्रियकराला संपवलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीची पत्नी आणि एका पुरुषाचे विवाहबाह्य संबंध होते. घटना घडण्याआधी प्रियकर हा आरोपी पतीच्या पत्नीला भेटण्यासाठी आला तिच्या घरी आला होता. तेव्हा आरोपी पती हा घरीच होता. प्रियकर हा त्याच्या पत्नीलासोबत घेऊन जाण्याबाबत हट्ट धरत होता. यावरून पती भडकला आणि त्याने रागात कात्रीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केली.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावरून प्रियकराचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. छत्तीगडच्या दुर्गे जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रवी असं आरोपी पतीचं नाव आहे. तर राजू असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

इतर बातम्या - वडिलांचं चहाचं दुकान, आई जनावरं चारते; एक डोळा अधू असतानाही क्रिकेमध्ये चमकला

रवीची पत्नी आणि राजूमध्ये अनेक दिवसांपासून होते प्रेमसंबंध

30 वर्षीय राजू साहू असं मृताचं नाव आहे. शनिवारी तो जवळच राहणाऱ्या रवी दहरिया (मारेकरी) च्या घरी गेला. रवीची पत्नी आणि राजू यांचे प्रेमसंबंध होते. रवीलाही याची जाणीव होती. या प्रकरणाबाबत रवी आणि राजू यांच्यात अनेकदा वादही झाले होते. दोघेही एकाच परिसरातील रहिवासी होते. घटनेच्या दिवशी राजू रवीच्या पत्नीला भेटण्यासाठी घरी घरी गेला, त्यावेळी रवीही तिथे उपस्थित होता.

इतर बातम्या - बोलता येत नाही, ऐकू येत नाही, विद्यार्थिनीनं अशी अनोख्या पद्धतीने दिली गणेशवंदना

वाद वाढल्यानंतर झाली राजूची हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, राजू प्रेयसीला म्हणजेच रवीच्या पत्नीला सोबत चलण्यासाठी हट्ट करत होता, परंतु ती सहमत नव्हती. यानंतर राजूने जबरदस्तीने तिचा हात धरला. हे पाहून रवीला राग अनावर झाला आणि त्याने कात्रीने राजूवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये राजूचा जागीच मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात कोसळली दरड, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 02:59 PM IST

ताज्या बातम्या