पवारांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांची हवा, लेकीला थेट हेलिकॉप्टरने धाडलं सासरी!

पवारांच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांची हवा, लेकीला थेट हेलिकॉप्टरने धाडलं सासरी!

करमाळ्यातील एका शेतकऱ्याने आपल्या वधू मुलीची पाठवणी हेलिकॉप्टरमधून केली आहे.

  • Share this:

विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी

पंढरपूर, 01 डिसेंबर : शरद पवारांचं महाविकासआघाडीचं सरकार आलं असल्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता संपली आहे. त्यामुळे आनंदाने शेतकरी बापाने मुलीची पाठवणी हेलिकॉप्टरने केली. तुळशी विवाहानंतर सगळीकडे लग्नसराई सुरू झाली आहे. अशातच राज्यात नुकतेच सत्तांतर झाल्याने शेतकर्यात समाधानाची भावना आहे. यामुळे करमाळ्यातील एका शेतकऱ्याने आपल्या वधू मुलीची पाठवणी हेलिकॉप्टरमधून केली आहे.

करमाळ्यातील कंदरमधील शिवाजी पाटील यांची कन्या स्नेहल हिचा विवाह इंदापूर तालुक्यातील बेलवाडीमधील कांतीलाल जामदार यांचे पुत्र अक्षय याच्याशी आज होत आहे. कंदरमधील शिवाजी पाटील हे शेतकरी वडीलोपार्जित शेतीचेच काम करतात. मुलीचं लग्न ठरल्यानंतर स्वतःच्या मुलीचा विवाह आठवणीत रहावा असा करण्याची त्यांची इच्छा होती. आपल्या मुलीला लग्नस्थळी पाठवण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर बोलवलं. मुलगी असली तरी तिची हौस करण्यात कुठेही कमी पडायचं नाही अशीच पाटील कुटुंबाची इच्छा होती.

इतर बातम्या - हैदराबाद बलात्कार प्रकरणी टायर मेकॅनिकचा पुरावा, 48 तासांत आरोपींना गेम ओव्हर

आज कंदर गावात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर आल्याने गावकऱ्यांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. शिवाजी पाटील यांनी मुलीच्या लग्नाची लग्न पत्रिकासुध्दा एका हातरूमालवर छापली आहे. जेणेकरून त्याचा वापर ज्याला दिली तो करेल. नुकतेच राज्यात सत्ताबदल झाला आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांची दु:ख जाणणारे नेते असल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. त्यामुळे आता शेतकरी ताठ मानाने उभा राहील. आता आम्हाला चांगले दिवस येतील. म्हणून आमच्या ही हौसेला मोल नाही. याच आनंदात मी मुलीला हेलिकॉप्टर ने पाठवणी केली असल्याचं पाटील म्हणाले.

इतर बातम्या - निर्दयी! 6 वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या, शाळेच्या बेल्टने आवळला गळा

Published by: Renuka Dhaybar
First published: December 1, 2019, 6:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading