कोरोनामुळे जुळेना रेशीम गाठी, वधू-वरांचा हिरमोड!

कोरोनामुळे जुळेना रेशीम गाठी, वधू-वरांचा हिरमोड!

सध्या लग्न सराई सुरू असल्याने मनमाड,मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण अनेक लग्न सोहळे आणि स्वागत समारंभ होते.

  • Share this:

मनमाड, 18 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसमुळे बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. खबरदारी म्हणून गर्दी न करण्याचं राज्य सरकारने आवाहन केलं आहे. कोरोनाचा फटका लग्न सोहळे आणि स्वागत समारंभाला देखील बसला आहे.

मनमाडसह,मालेगाव, येवला,चांदवड,नांदगांव, सटाणा यासह नाशिकच्या ग्रामीण भागात आज व 31 मार्च पर्यंत होणारे सर्व लग्न आणि स्वागत समारंभ नागरिकांनी स्वतःहून रद्द  केले आहे. ऐन वेळी लग्न रद्द कऱण्यात आल्यामुळे भावी वधू-वरांचा हिरमोड झाला तर काहींचा लग्न आणि स्वागत समारंभाची तयारीसाठी केलेला खर्च देखील वाया  गेला आहे.

मनमाड शहरातील व्यापारी हाजी अनवर खान त्यांच्या मुलाच्या लग्ना निमित्त त्यांनी 21 मार्च रोजी स्वागत समारंभ ठेवला होता. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती. या समारंभाला सुमारे 5 ते 6 हजार नागरिक उपस्थित राहणार होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून त्यांनी स्वागत समारंभ रद्द केला आहे.

सध्या लग्न सराई सुरू असल्याने  मनमाड,मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण अनेक लग्न सोहळे आणि स्वागत समारंभ होते. मात्र, नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी 31 मार्च पर्यंत कोरोनामुळे सर्व लग्न आणि स्वागतावर बंदी घातली याची अंमलबजावणी नागरिकांनी स्वतःहून करत आहे.

 जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार कराल तर होईल कारवाई

कोरोना विषाणूने राज्यात थैमान घातलं असताना जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्यांवर प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसेच संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

भुजबळ म्हणाले, सध्यस्थितीत राज्यात कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा व जीवनावश्यक वस्तू जादा दराने विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब विचारात घेता जनतेचे दैनंदिन जनजीवन सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने जनतेस जीवनावश्यक वस्तु सहजासहजी व रास्तभावात उपलब्ध होणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे आहे.

दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा असल्याचे भासवून त्याचा साठा करणे व तो चढ्या भावाने विक्री करणे अशी परिस्थिती उद्‌भवल्याचे निदर्शनास येत असल्यास जीवनावश्वक वस्तु अधिनियम, 1955 व त्यानुसार निर्गमित इतर नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार प्रतिबंध आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 मधील तरतुदीनुसार साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्या तसेच जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यात अडथळा आणणाऱ्या संबंधित रास्तभाव दुकानदार, इतर दुकानदार तसचे संबंधित व्यक्ती, संस्था यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाच्या 13 मार्च, 2020 च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तु अधिनियम, 1955 च्या परिशिष्टामध्ये कलम 2 ए अंतर्गत 'मास्क (2 प्लाई व 3 प्लाई सर्जिकल मास्क, एन-95 मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर' यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. याचा काळाबाजार व साठेबाजी करणाऱ्यावरही कठोर कारवाई करणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

First published: March 18, 2020, 5:41 PM IST
Tags:

ताज्या बातम्या