मोठया लग्नाचा हट्ट नडला, भटजीसह वधू-वराच्या आई-वडिलांना खावी लागली जेलची हवा!

मोठया लग्नाचा हट्ट नडला, भटजीसह वधू-वराच्या आई-वडिलांना खावी लागली जेलची हवा!

पोलिसांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याची उदघोषणा करुन जमलेल्यांना परत जाण्यास सांगितलं.

  • Share this:

बीड, 19 मार्च : कोरोना व्हायरसबाबत जिल्हाधिकारी यांचा जमावबंदी आदेश डावलत नातेवाईकांना जमवून लग्न लावणाऱ्या भटजी आई-वडील नातेवाईक, फोटोग्राफरसह आठ जणांना आज काही काळ पोलीस कोठडींची हवा खावी लागली.

ही घटना बीड जिल्हयातील माजलगाव शहरात जवळील ब्रम्हगाव येथे घडली. गाजावाजा करून धूम धडाक्यात लग्न करण्याचा हट्ट नडला त्यातच कायदा मोडला गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं.

माजलगाव शहरापासून 1 किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास लग्नासाठी जमाव जमला असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली. यावरून त्यांनी शहर पोलिसांना लग्नस्थळी जाण्यास सांगितलं. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस ताफा घेवून लग्नस्थळी गेले असता. यावेळी पोलिसांना लग्नस्थळी 100- 125 लोकं जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कोरोना संसर्गाबाबत जिल्हाधिकारी यांचे आदेश असल्याची उदघोषणा करुन जमलेल्यांना परत जाण्यास सांगितलं. यास नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामुळे पोलिसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केले. यानंतर 5 - 6 नातेवाईकांनी लग्न उरकुन घेतलं.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये विठ्ठल पांडुरंग कांबळे राहणार ब्रम्हगाव तालुका माजलगाव ( नवरीचे वडील ), मनकर्णा सुभाष पाटोळे, रा,.लवुळ ता. माजलगाव ( नवरदेवाची आई ), ज्ञानेश्वर उद्धव पाटोळे रा. लवुळ ( नवरदेवाचे चुलते ), चंदू महादेव आटवे रा. लवुळ ( नवरदेवाचे मामा ), कैलास सुदाम कसाब रा. गोळेगाव ता . परतुर ( नवरीचा मामा ), सुनील सुदाम वैराळ रा . सांवगी ता . परतुर ( सोकान्या ), स्वप्निल अनिल कुलकर्णी रा . डेपेगाव ता. माजलगाव ( भटजी ), गणेश अनंत मारगुडे रा. खानापुर ( फोटोग्राफर ) यांचा समावेश होता.

First published: March 19, 2020, 10:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या