या कारणामुळे पुण्यात वाढला कोरोनाचा धोका, मुंबईलाही टाकलं मागे

या कारणामुळे पुण्यात वाढला कोरोनाचा धोका, मुंबईलाही टाकलं मागे

मुंबईच्या तुलनेत पुण्यात कोरोनाचा फैलाव जास्त का होतोय असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

  • Share this:

पुणे, 10 सप्टेंबर : संपूर्ण राज्यभर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अशात मुंबई, ठाणे आणि पालघरसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनोचा धोका जास्त आहे. या पुणेसुद्धा कमी नाही. पुण्यातही कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे इथे कोरोनाचा धोका वाढणं हे सहाजिक आहे. पण मुंबईच्या तुलनेत पुण्यात कोरोनाचा फैलाव जास्त का होतोय असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे.

तर याचं कारण म्हणजे पुणेकरांमधील टू व्हीलर वापराचं प्रमाण. पुण्यात मोठ्या प्रमाणात दुचाकीचा वापर केला जात आहे. यामध्येही अनेक नियमांचं उल्लंघन केलं जातं. स्वत: पुणे मनपाचे आयुक्त विक्रमकुमार यांनीच हा मुद्दा पुढे आणला आहे. पुण्यात लॉकडाऊनमुळे गेले सहा महिने पीएमपी बससेवा बंद असली तरी लोक वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या बाईकचा वापर करताहेत. त्यातून पुणे शहरातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेल्याचं निरिक्षण मांडलं जातं आहे.

पुण्यात लॉकडाऊन असतानाही नागरिकांची रस्त्यावर वर्दळ सुरूच होती. त्यात आता राज्य अनलॉक होत असताना कोरोना संपल्यासारखे लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यात रोज कोरोनाचे धडकी भरवणारे आकडे समोर येतात.

बुधवारीही राज्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळाला. गेल्या 24 तासांत 23,816 नवे रुग्ण सापडले, तर 325 रुग्णांचा Covid-19 मुळे मृत्यू झाला. पुणे जिल्ह्याबरोबरच मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचं थैमान पुन्हा नव्याने सुरू झालं आहे. राज्यभरात सध्या 2,52,734 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यातले सर्वाधिक पुणे, मुंबई आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये आहेत. कुठल्याही दुसऱ्या राज्यात एवढ्या संख्येने उपचाराधीन कोरोनारुग्ण नाहीत.

महाराष्ट्र सरकारने इतर राज्यांना जाणारा ऑक्सिजन थांबवला, MPमध्ये भयावह परिस्थिती

पुण्यात सर्वाधिक

पुणे जिल्ह्यात सध्या Covid-19 चे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशात पुण्याचा आकडा अव्वल आहे. त्यामुळे चिंता वाढत आहे. पुण्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात कोरोना प्रकोप वाढतो आहे.

मुंबई महानगर भागात गेल्या 24 तासांत 2227 रुग्ण दाखल झाले आहे. तर पुण्यात 2340 रुग्ण दिवसभरात सावपडले.

ठाणे होतंय कोरोनाचा हॉटस्पॉट

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढू लागला आहे. ठाणे शहरात 495, नवी मुंबईत 391, तर कल्याण डोंबिवलीत गेल्या 24 तासांत तब्बल 785 रुग्ण सापडले आहेत.

'सेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असले तरी...' इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया

पश्चिम महाराष्ट्र आणि नागपूर धोक्यात

सप्टेंबरमध्ये रुग्णवाढीचा कळस गाठला जात आहे. गेले काही दिवस 20 हजारांच्या आसपास नवे रुग्ण राज्यात सापडत आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) वाढत असलं, तरी रुग्णवाढीचा दर आणि हा विषाणू गावागावात पसरण्याचा वेग वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्याबाहेर नवे रुग्ण दाखल व्हायची संख्या पश्चिम महाराष्ट्र आणि नागपुरात सर्वाधिक आहे.

गेल्या 24 तासांत 13,906 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 6,86,462 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील मृत्यूदर पहिल्यांदाच तीनच्या खाली आला आहे. आता महाराष्ट्रात Covid मृत्यूदर 2.87 टक्के एवढा आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 10, 2020, 10:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading