जालन्यात जोरदार पावसामुळे पूल गेला वाहून, अंबड-पाथरी संपर्क तुटला

जालन्यात जोरदार पावसामुळे पूल गेला वाहून, अंबड-पाथरी संपर्क तुटला

नदीचा पाणी प्रवाह गतीने असल्यामुळे मातीचा भराव टाकून बनविलेला कच्चा पूल पाण्यासोबतच वाहून गेला.

  • Share this:

जालना, 20 सप्टेंबर : अंबड-घनसावंगी परिसरात शनिवारी रात्री सलग 3 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड येथील नरुळा नदीवरील कच्चा पुल वाहून गेला. ज्यामुळे अंबड-पाथरी गावाचा संपर्क तुटला असून यामार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद झाली आहे.

नरुळा नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्यामुळे तो पूल पाडून तेथे नवीन पुलाचे निर्माणकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, पर्यायी व्यवस्था म्हणून नरुळा नदी पात्रात मातीचा भराव टाकून कच्चा पूल तयार करण्यात आला होता.  रात्री सलग 3 तास झालेल्या मुसळधार पावसामुळे नरुळा नदीच्या पाणीसाठ्यात अचानकच प्रचंड वाढ झाली.

राजकारणातली मोठी बातमी, IPS अधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न

नदीचा पाणी प्रवाह गतीने असल्यामुळे मातीचा भराव टाकून बनविलेला कच्चा पूल पाण्यासोबतच वाहून गेला. ज्यामुळे अंबड-पाथरी गावाचा संपर्क तुटला असून यामार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद झाली आहे.

कच्चा पूल बनवताना पाण्याच्या विसर्गासाठी मोठे सिमेंट पाईप टाकून त्यावर मातीचा भराव टाकणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता फक्त मातीचा भराव टाकून थातूर-मातूर कच्चा पूल बनविण्यात आल्यामुळे आज अंबड-पाथरी गावाचा संपर्क तुटला असून येथे एखादा अनुचित प्रकार घडण्याची भीती गावकऱ्यांना वाटत आहे.

पुण्यातही जोरदार पावसाने पिकं गेली वाहून!

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव, पोंदेवाडी, अवसरी परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसाने शेतीच मोठं नुकसान झालं आहे. खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने एक प्रकारे ढगफुटी सारखी अवस्था पाहायला मिळाली. यात शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर काही ठिकाणी शेतीच वाहून गेली आहे.

...आणि संजय राऊतांनी केले योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन

लाखणगाव पोंदेवाडी या दोन्ही गावामधील तलाव, राजोबा पाझर तलाव या मधून खूप वेगाने पाण्याचा विसर्ग झाल्याने ओठया लगतच्या शेतात पाणी घुसले. या भागात पंचनामे करावे आणि नुकसान मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. असा पाऊस आणि अशी ढगफुटी कधीही पहिली नाही अस या परिसरातील शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद बटाटा पिकाचे पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी दौरा करून परतले आणि मागे पुन्हा एकदा या परिसरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी धास्तावला. शेतात जे काही पीक राहिलं होतं ते पावसाच्या माऱ्याने जमिनीच्या वर आलं.

Published by: sachin Salve
First published: September 20, 2020, 10:30 AM IST

ताज्या बातम्या