कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका, धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

गस्टच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं होतं. घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.

  • Share this:

कोल्हापूर, 06 सप्टेंबर : मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीचं पाणी तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडलं असून जिल्ह्यातील 55 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहरात पावसाची काही प्रमाणात उघडीप असली तरी धरण क्षेत्रात मात्र जोरदार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 33 फुटांवर गेली आहे. तर सोमवारपर्यंत कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण आहे.

ऑगस्टच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे संपूर्ण जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं होतं. घरात पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यातून आता कुठे घरं सावरत नाहीत तर पुन्हा एकदा पुराचं सावड कोल्हापूरकरांवर आहे. सुरक्षेच्या दृष्टीने राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले आहेत तर कोयना, वारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सहाव्यांदा भामरागडला पुर आला आहे. जिल्हयात मध्यराञीपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. पर्लकोटा नदीचा पूर गुरुवारी ओसरला होता. माञ, आज पहाटेपासून परत एकदा पर्लकोटा नदीला पूर आला असून पाणी वेगाने भामरागड गावात शिरलं आहे. मोठा पूल पाण्यात बुडाला असून बांडीया नदीसह तुमरगुडा नाल्यावरचा पूल पाण्याखाली गेल्याने भामरागड तालुक्यातल्या शंभर गावांचा संपर्क तुटला आहे.

इंद्रावती नदीने लगतच्या छत्तीसगडमध्ये धोक्याची पातळी पार केल्याने भामरागडला पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या नजिकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.

इतर बातम्या - बाप्पाची आरती ठरली अखेरची, 10 वर्षाच्या चिमुकल्याला...

Weather Update: मुंबईसह राज्यातील 'या' भागांत 6 ते 8 सप्टेंबरपर्यंत होणार अतिवृष्टी!

ल्या दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे नेहमी प्रमाणे मुंबईचे हाल झाले. अनेक उपनगरांमध्ये पाणी साचलं होतं तर रेल्वेही बंद पडली होती. गुरुवारी मुंबईत पावसाचा जोर ओसरलेला पाहायला मिळाला. पण येत्या काही दिवसांमध्ये कोकण, गोव्याच्या तुरळक भागांता मुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भातदेखील पुढच्या काही दिवसांमध्ये अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढच्या 4 दिवसांत महाराष्ट्रात कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 6 ते 8 सप्टेंबर दरम्यान विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

इतर बातम्या - भारत आज रात्री चंद्रावर रचणार इतिहास, वाचा 'Chandrayaan 2' चा महत्त्वाचा टप्पा

गुरुवारी 24 तासांत कोकण आणि गोव्यात अतिवृष्टी झाली आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे कोयना, राधानगरी धरण परिसरात पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे परिसरात पुराचा धोका निर्माण झाला आहे. घाट परिसर वगळता इतर ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. मराठवाड्यातील जाफराबादमध्ये 50 मिमी, भोकरदन, पाथरी, वाशीमध्ये 30 मिमी तर अहमदपूर 20 मिमी पाऊस झाला.

VIDEO: आझम खान यांच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 10:38 AM IST

ताज्या बातम्या