नापास होण्याच्या भीतीने B.COM करणाऱ्या तरुणाने लावला गळफास!

मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना तरुणाच्या खिशातून एक चिठ्ठी सापडली. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2019 08:59 AM IST

नापास होण्याच्या भीतीने B.COM करणाऱ्या तरुणाने लावला गळफास!

अकोला, 14 जुलै : नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात घडला आहे. बी.कॉमच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेत नापास होण्याच्या भीतीने अकोल्यातील हिंगणी बु इथल्या 22 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 13 जुलै रोजी घडली. तरुण वयात अशा पद्धतीने जीव गमावल्यामुळे सगळीकडे या बातमीने शोककळा पसरली आहे.

शुभम मुरलीधर बोंडे असं मृतक विद्यार्थ्याचं नाव आहे. हिंगणी बु इथला शुभम बोंडे हा युवक अकोल्यातील एका महाविद्यालयात बी.कॉम अंतिम वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने बी.कॉम अंतिम वर्षाची परीक्षा दिली. त्याने पेपर चांगले लिहले नव्हते. त्यामुळे त्याच्या मनात नापास होण्याची भीती होती. त्यात काही दिवसांत बी.कॉमचा निकाल लागणार आहे. आपण या परीक्षेत नापास होऊ अशी भीती शुभम बोंडेला होती.

या भीतीतूनच त्याने 13 जुलै रोजी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच दहीहांडा पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. तसंच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवला. दरम्यान, मृतक युवकाच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये बी.कॉमचे पेपर चांगले न गेल्याने आत्महत्या करीत असल्याचे म्हटलं आहे.

या प्रकरणी दहीहांडा पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तर ते या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. तर घरातल्या तरुण मुलाने स्वत:ला संपवल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे शुभमच्या मित्रांनी शोककळा व्यक्त केली आहे.

VIDEO: पश्चिम रेल्वेवर 5 तासांचा जंबो मेगाब्लॉक, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...