खिश्याला 'पेन' देणाऱ्या 300 गोळ्यांवर लवकरच बंदी?

खिश्याला 'पेन' देणाऱ्या 300 गोळ्यांवर लवकरच बंदी?

  • Share this:

नवी दिल्ली, 04 आॅगस्ट : अनेकदा अनाहुतपणे सर्दी खोकल्यावर घेतली जाणारी दोन किंवा त्यापेक्षा जास्त औषध असणाऱ्या गोळ्या सिरप यावर आता बंदी येणार आहे. फक्त एकच औषध असणाऱ्या गोळ्यावर ही बंदी नसून फक्त शास्त्रिय दृष्ट्या चुकीच्या एकत्रित औषधाच्या गोळ्यावर बंदी येणार आहे. यामुळे अर्थातच अधिक किंमत वसुल करणाऱ्या कंपन्याचे नुकसान होईल. जवळ जवळ 300 हून अधिक अशा औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच बंदी घातली जाऊ शकते. मात्र यामुळे अशी औषध बनवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या मैदानात उतरू शकतात. या बंदीचा मोठा फटका कंपन्यांना बसणार आहे.

सॅरिडॉन आणि डी कोल्डसह ३०० हून अधिक औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच बंदी घातली जाऊ शकते. ही फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधे आहेत. स्टिरॉईड्सचं प्रमाण जास्त असल्यानं बंदीची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारनं या औषधांवर बंदी घातल्यास त्याचा एबॉटसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांसह पिरामल, मॅक्लिऑड्स, सिप्ला आणि ल्युपिनसारख्या राष्ट्रीय कंपन्यांना फटका बसणार आहे.

दरम्यान, सरकारनं हा निर्णय जाहीर केल्यास त्याविरोधात या कंपन्या न्यायालयात धाव घेऊ शकतात. सरकारनं हा निर्णय लागू केल्यास फेंसेडिल, सॅरिडॉन, डी कोल्ड टोटलसारखे कफ सिरप आणि पेन किलरवर बंदी येऊ शकते.

एफडीसी म्हणजे काय?

- कॉम्बिनेशन ड्रगमध्ये दोन किंवा अधिक घटक असतात

- औषधांचं हे मिश्रण अशास्रीय आहे

- शरीराला आवश्यक नसणारी औषधंही यामुळे शरीरात जातात

- सर्दी, खोकला, ताप यासारख्या सर्वसामान्य आजारांवरच्या औषधांचा यात समावेश

- विकसित देशांमध्ये अशा औषधांवर बंदी आहे

- यामुळे कंपन्या अधिक किंमत आकारतात

First published: August 4, 2018, 11:09 PM IST

ताज्या बातम्या