खाकी वर्दीसाठी सोडल्या दोन सरकारी नोकऱ्या, दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

अमन ठाकूर यांच्या फेसबुक डीपीला 'काही लढाया एकट्याने लढाव्या लागतात' असं सांगणारा फोटो...

News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2019 10:09 AM IST

खाकी वर्दीसाठी सोडल्या दोन सरकारी नोकऱ्या, दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण

पुलवामा हल्ल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांचा खात्मा करायला सुरूवात केली आहे. कुलगाम येथे रविवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आलं आहे. तर, कारवाईमध्ये डीएसपी अमन ठाकूर शहीद झाले असून मेजरसह  2 जवान आणि 2 नागरिक जखमी झाले.

अमन ठाकूर यांची पहिल्यापासून पोलिस होण्याची इच्छा होती. अंगावर खाकी वर्दी चढवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी अभ्यास केला.

दरम्यानच्या काळात त्यांना दोन वेळा सरकारी नोकरी करण्याची संधी मिळाली. तेव्हा सरकारी नोकरी करत करत त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. अखेर 2011 मध्ये ते पोलिस अधिकारी झाले.

Loading...

दक्षिण काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या कुलगाममध्ये अमन ठाकूर यांनी अनेक धडक कारवाया केल्या आहेत. त्यांनी दहशतवाद्यांना स्वत: सामोरं जात पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व केलं.

डीएसपी अमन ठाकूर यांना उल्लेखनिय कामगिरीसाठी डीजीपी पदकाने सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवाय त्यांना शेर-ए-काश्मीर या शौर्य पदकाने गौरवलं होतं.

शहीद डीएसपी अमन ठाकूर यांनी पोलिसात दाखल होण्यासाठी दोन सरकारी नोकऱ्या सोडल्या होत्या. पहिली नोकरी समाज कल्याण विभागात मिळाली होती. त्यानंतर त्यांनी एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणूनही काम केले.

शहीद डीएसपी अमन ठाकुर यांच्या फेसबुक डीपीला केही लढाया एकट्याने लढायच्या असतात, असं सांगणारा फोटो लावला आहे. देशासाठी लढताना वीरमरण आलेल्या अमन ठाकूर यांच्या मागे कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. पुढे वाचा...दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या पुलवामाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यात आईडी स्फोट घडवून दहशतवादी हल्ला केल्यानंतर पुलवामा पुन्हा चर्चेत आलं आहे. या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले.

याआधीही पुलवामात असे दहशतवादी हल्ले झाले आहेत. सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्याचा बदला घेत दोघा दहशतवाद्यांना सुरक्षादलाने कंठस्नान घातले. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या पुलवामाबद्दल इतर गोष्टी जाणून घ्या...

पुलवामा हा जम्मू काश्मीरमधील एक जिल्हा असून 1 हजार 398 चौरस किमी क्षेत्रफळ आहे. पाकिस्तानपासून 652 किमी अंतरावर पुलवामा जिल्हा आहे.

जम्मू काश्मीर हे सर्वाधिक मुस्लिम असलेले भारतातील एकमेव राज्य आहे. पुलवामात दुधाचे उत्पादन जास्त होते. याला काश्मीरचे दुधा-कुल आणि काश्मीरचा आनंद असंही म्हटलं जातं.

2011 च्या जनगणनेनुसार पुलवामाची लोकसंख्या 5 लाख 70 हजार इतकी आहे. यात पुरुष 2 लाख 93 हजार तर 2 लाख 67 हजार आहेत. यापैकी 65 टक्के लोक साक्षर आहेत.

पुलवामात 95.49% मुस्लिम, 2.47% हिंदू, 0.20% ख्रिश्चन, 1.68% शीख, 0.01% बुद्धिस्ट आणि 0.15% इतर लोक आहेत.

2011 पर्यंत पुलवामात 127 कुटुंबे बेघर होती. ती रस्त्याच्या कडेला राहून दिवस काढत होती. यातील लोकांची संख्या 851 इतकी होती.

जम्मू काश्मीरमध्ये वातावरणातील बदलामुळे दोन राजधानी आहेत. हिवाळ्यात जम्मू तर उन्हाळ्यात श्रीनगर ही काश्मीरची राजधानी असते. श्रीनगरपासून पुलवामा 40 किलोमीटर दूर आहे.

पुलवामाचे नाव पलगाम असं होतं. अनेक शतकांपासून त्याला पानवानगाम म्हटलं जात होतं. त्याला लहान करुन पलगाम झालं होतं. त्यानंतर त्याचा अपभ्रंश होऊन पुलवामा म्हटलं जाऊ लागलं.

पुलवामा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत शेतीचं योगदान जास्त आहे. यात भातशेती, तेलबिया, गवत याशिवाय केसर आणि दुग्ध उत्पादन केलं जातं. या सगळ्याने जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मदत होते.

पुलवामात शेतीमध्ये सफरचंद, बदाम, आक्रोड आणि चेरी या फळांचे उत्पादन घेतलं जातं. याशिवाय सिमेंटचे कारखानेदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. या ठिकाणी प्रतिदिन 1200 एम टन सिमेंट तयार होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 09:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...