पुणे, 25 जून : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी स्वतःहून कोर्टासमोर शरण आले आहेत. त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयानं शिरीष यांना आठ दिवसांच्या आत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णी, त्यांची पत्नी हेमंती यांच्यासह १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिरीष यांच्याविरुद्ध देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान. डीएसकेंना अवैध कर्ज दिल्याप्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा