सुप्रीम कोर्टात गेलेले 'डीएसके' पुणे पोलिसांसाठी मात्र 'वॉन्टेडच' !

सुप्रीम कोर्टात गेलेले 'डीएसके' पुणे पोलिसांसाठी मात्र 'वॉन्टेडच' !

'डीएसके' ठेवीदार फसवणूक प्रकरणी अटकेची कारवाई टाळण्यासाठी अज्ञातवासात गेलेले पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. असं असलं तरी पुणे पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरू केली असून त्यांच्या अटकेसाठी तपास पथकंही रवाना केलीत.

  • Share this:

21 डिसेंबर, पुणे : 'डीएसके' ठेवीदार फसवणूक प्रकरणी अटकेची कारवाई टाळण्यासाठी अज्ञातवासात गेलेले पुण्यातले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. असं असलं तरी पुणे पोलिसांनी त्यांची शोधाशोध सुरू केली असून त्यांच्या अटकेसाठी तपास पथकंही रवाना केलीत. डीएसके सुप्रीम कोर्टात गेले असले तरी त्यांच्याविरोधातल्या अटकेच्या कारवाईवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, पोलिसांच्या दृष्टीने ते वॉन्टेडच असून आम्ही त्यांना लवकरच आम्ही त्यांना अटक करू, असं पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेचे एसीपी मिलिंद पाटील यांनी सांगितलंय.

एसीपी मिलिंद पाटील म्हणाले, ''उच्च न्यायालयाने डीएसकेंचा जामीन फेटाळल्याने त्यांना शोघण्यासाठी आम्ही पोलीस पथके रवाना केलीत. त्यांचा ठाव ठिकाणा आम्ही शोधत असून, आम्हाला काही धागेदोरेही मिळालेत. त्यांचा पासपोर्टही आमच्याकडे जमा आहे. तसंच अटक टाळण्यासाठी ते सुप्रीम कोर्टात गेले असले तरीही अटकेच्या कारवाईवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. पण आत्ताच त्यांना फरार घोषित करता येणार नाही ''

मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना ठेवीदारांची देणी चुकवण्यासाठी 50 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले होते. पण कोर्टाने दिलेल्या वेळेत डीएसकेंनी पैसे भरलेच नाहीत, उलट मुदत वाढवून मागितली होती. पण कोर्टाने त्यांची मुदत वाढीची मागणी फेटाळून लावत पोलिसांना पुढील कारवाईचे स्पष्ट आदेश दिलेत तेव्हापासून डीएसके अज्ञातवासात गेलेत त्यामुळे डीएसकेंना आता कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

डीएसकेंनी 700 ते 800 ठेवीदारांची हजारो कोटींची देणी थकवलीत. हडपसरच्या ड्रीम सिटी प्रोजेक्टमुळे डीएसके आर्थिक दिवाळखोरीत निघालेत. तेव्हापासून ठेवीदारांनी त्यांच्याकडे पैसे परत मिळवण्यासाठी तगादा लावलाय. पण डीएसकेंनी त्यांच्या काही मालमत्ता विकूनही ठेवीदारांची देणी चुकती केलेलीच नाहीत. म्हणूनच पुण्यातील 20 ठेवीदारांनी डीएसकेंच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. तेव्हापासूनच डीएसके अटकेची कारवाई टाळण्यासाठी कोर्टात धाव घेताहेत.

First published: December 21, 2017, 8:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading