डीएसकेंना २३ नोव्हेंबरपर्यंत कोर्टाचा तात्पुरता दिलासा

डीएसकेंना २३ नोव्हेंबरपर्यंत कोर्टाचा तात्पुरता दिलासा

पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा दिलाय.

  • Share this:

17 नोव्हेंबर : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना मुंबई उच्च न्यायालयाने २३ नोव्हेंबरपर्यंत तात्पुरता दिलासा दिलाय. तसंच तुम्ही काय प्रतिष्ठा कमावली याच्याशी आमचं काही देणघेण नसून थकलेल्या ठेवींबाबत भूमिका स्पष्ट करा असे निर्देशही कोर्टाने दिले.

सुमारे २७७४ ठेविदारांच्या २०० कोटींहून अधिकची देणी थकवल्याचा आरोप डीएसकेंवर करण्यात आलाय. पुणे सत्र न्यायालयानं जामीन फेटाळ्यानंतर डीएसकेंनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका केली आहे. या याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टाने तुर्तास डीएसकेना दिलासा दिलाय.  गेल्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयानं डीएसकेंना आठवड्याभराची मुदत देत ठेवीदारांचे पैसे कसे परत करणार याची विचारणा केली होती. त्यानुसार २ महिन्यांत १५० कोटी परत करण्याची तयारी डीएसकेंकडून कबूली देण्यात आली.

मात्र यास स्पष्ट नकार देत न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी पुढिल सुनावणीच्या वेळेस जामीनासाठी युक्तिवाद सुरू करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिलेत. दोन महिने हा फार मोठा कालवधी असून कबूल केल्यानंतरही लोकांना त्यांचे पैसे वेळेत मिळत नाहीत असा अनुभव असल्याचं यावेळी न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी बोलून दाखवलं.

इतक्या वर्षांत डीएसकेंनी काय प्रतिष्ठा कमावली याच्याशी आमचं काही देणघेण नसून थकलेल्या ठेवींबाबत याचिकाकर्त्यांनी आपली भुमिका स्पष्ट करावी असे निर्देश हायकोर्टानं दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 07:04 PM IST

ताज्या बातम्या