मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /डीएसके येत्या 13 फेब्रुवारीला कोर्टासमोर हजर राहणार !

डीएसके येत्या 13 फेब्रुवारीला कोर्टासमोर हजर राहणार !

हायकोर्टाने फटकारताच डीएसकेंनी पुढच्या तारखेला म्हणजेच 13 फेब्रुवारीलाच कोर्टासमोर हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे. डीएसकेंनी न्यूज18 लोकमतशी बोलताना यासंबंधीची माहिती दिली.

    05 फेब्रुवारी, मुंबई : हायकोर्टाने फटकारताच डीएसकेंनी पुढच्या तारखेला म्हणजेच 13 फेब्रुवारीलाच कोर्टासमोर हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे. डीएसकेंनी न्यूज18 लोकमतशी बोलताना यासंबंधीची माहिती दिली.

    डीएसके म्हणाले, ''हायकोर्टाने मला हजर राहायला सांगितल्यामुळे मला माझी बाजू मांडण्याची संधी मिळेल. मी तपास यंत्रणेला आत्तापर्यंत पूर्ण सहकार्य केलं आहे आणि आत्ताही मी सहकार्य करणार आहे, तसंच गुंतवणूकदारांचे पैसे देण्यासाठी मी माझ्या मालमत्ता विकायला तयार आहे पण काही विघ्नसंतोषी मंडळी त्यात कायदेशीर अडचणी निर्माण करताहेत, लोकांमध्ये अफवा पसरत आहेत. त्यामुळे मालमत्ता विकत घेण्यासाठीही कोणी पुढे येत नाही. त्यामुळे मी आता रक्कम जमा करण्यासाठी क्राऊड फंडिंगचा वापर करणार आहे. जगभरातील माझे मित्र मला आर्थिक करतील, तसंच इतरांनीही ते करावं, असं मी आवाहन करतोय, कायदेशीर बाबींमुळे मला पैसे परत करण्यास अडचणी उभ्या राहिल्या आहेत, पण मी कुठेही पळून जाणार नाहीये, सगळ्यांचे पैसे परत करणार आहे.

    सलग तिसऱ्यांदा डीएसके गुंतवणूकदारांसाठीचे 50 कोटी कोर्टात भरण्यास असमर्थ ठरलेत. यावरून हायकोर्टाने आज डीएसकेंना चांगलंच फटकारलंय. डीएसकेंना मालमत्ता विकून पैसे उभा करता येत नसतील त्यांनी पाहिजे तर भीक मागावी, पण गुंतवणूदारांचे पैसे परत करावेत, अशा कडक शब्दात कोर्टाने डीएसकेंना फटकारलं होतं. त्यानंतर डीएसकेंनी 'क्राऊड फंडिंग'चा पर्याय कोर्टासमोर ठेवलाय.

    First published:
    top videos

      Tags: DSK, High court