S M L

डीएसकेंनी घेतली अजित पवारांची भेट !, आर्थिक मदतीचं आवाहन

आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या डीएसकेंनी आज मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झालीय. या भेटीत डीएसकेंनी अजित पवारांकडे या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मदतीचे आवाहन केल्याचं कळतंय.

Chandrakant Funde | Updated On: Feb 6, 2018 01:43 PM IST

डीएसकेंनी घेतली अजित पवारांची भेट !, आर्थिक मदतीचं आवाहन

06 फेब्रुवारी, मुंबई : आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या डीएसकेंनी आज मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट झालीय. या भेटीत डीएसकेंनी अजित पवारांकडे  या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मदतीचे आवाहन केल्याचं कळतंय. काल मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर डीएसकेंनी क्राऊड फंडिंगचा पर्याय पुढे केलाय. याच रणनितीचा भाग म्हणून डीएसके विविध क्षेत्रातील मान्यवरांकडे आर्थिक मदतीचे आवाहन करताहेत.

गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी डीएसके त्यांच्या मालमत्ता विकायला तयार आहेत. पण व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांकडून डीएसकेंची चोहोबाजूनी कोंडी करून त्यांच्या मालमत्ता या स्वस्तात घशात घालण्याचा डाव आखला जातोय, असा गंभीर आरोप डीएसकेंकडून होतोय. या व्यावसायिक आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अजित पवारांची डीएसकेंना नक्कीच अप्रत्यक्षपणे मोठी मदत होऊ शकते. कदाचित त्यामुळे डीएसकेंनी मदतीसाठी अजित पवारांकडे मदतीची याचना केल्याचं बोललं जातंय. अर्थात अधिकृत सूत्रांनी मात्र, या माहितीला अजून दुजोरा दिलेला नाही पण या भेटीत डीएसकेंनी अजित पवारांकडे या आर्थिक कोडींतून बाहेर पडण्यासाठी सर्वोतपरी मदत करण्याचं आवाहन केल्याचं बोललं जात असून अजित पवारांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सांगितलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2018 01:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close