ठेवीदारांचे पैसे न भरल्याने डीएसकेंना अटक होण्याची शक्यता

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी हायकोर्टाला प्रपिज्ञापत्रात लिहून दिल्याप्रमाणे ठरलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांचे 50 कोटी भरले नाहीत त्यामुळे त्यांना आता अटक होण्याची शक्यता वाढलीय. याप्रकरणी हायकोर्टाने डीएसकेंना मुदत वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 19, 2017 06:47 PM IST

ठेवीदारांचे पैसे न भरल्याने डीएसकेंना अटक होण्याची शक्यता

19 डिसेंबर, मुंबई : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी हायकोर्टाला प्रपिज्ञापत्रात लिहून दिल्याप्रमाणे ठरलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांचे 50 कोटी भरले नाहीत त्यामुळे त्यांना आता अटक होण्याची शक्यता वाढलीय. याप्रकरणी हायकोर्टाने डीएसकेंना मुदत वाढवून देण्यास स्पष्ट नकार दिलाय. डीएसकेंनी ठेवीदारांचे पैसै भरले नसतील तर पोलिसांनी पुढची कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने दिलेत. डीएसकेंनी यापूर्वीच हायकोर्टाला लिहून दिलेल्या पत्रिज्ञापत्रात पैसे भरू शकलो नाहीतर पोलिसांना शरण जाईल, असं लिहून दिलंय. त्यामुळे यापुढे पोलीस डीएसकेंविरोधात अटकेची कारवाई करू शकतात.

मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना मालमत्ता विकून मिळालेल्या नफ्यातली 25 टक्के रक्कम ठेवीदारांची देणी चुकती करण्यासाठी पंधरा दिवसांच्या आत 50 कोटी रुपये अनामत रक्कम म्हणून कोर्टात भरणं बंधनकारक होतं. पण आज त्याची मुदत संपली तरी डीएसकेंनी कोणतीच हालचाल करता आज पुन्हा मुदतवाढ मागितली त्यावर कोर्टाने स्पष्ट नकार दिलाय. त्यामुळे पुणे पोलीस कोणत्याही क्षणी डीएसकेंना अटक करू शकतात. डीएसकेंनी गुंतवणूकदारांचे किमान 800 कोटी रुपये थकवलेत. याविरोधात अनेक ठेवीदारांनी डीएसकेंविरोधात पुणे पोलिसांकडे लेखी तक्रार दिलीय. त्यानुसारच डिएसकेंवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. याच गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी डीएसके हायकोर्टात गेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 19, 2017 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...