'डीएसकें'चा अटकपूर्व जामीन पुणे कोर्टाने फेटाळला

'डीएसकें'चा अटकपूर्व जामीन पुणे कोर्टाने फेटाळला

डीएसके दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन पुणे कोर्टाने फेटाळून लावलाय. गुंतवणूकदारांनी पुणे पोलिसात तक्रारी दाखल केल्यानंतर डीएसके अंतरिम जामिनासाठी कोर्टात गेले होते. गेल्या मंगळवारी त्यांना सुनावणीसाठी 2 दोन दिवसांचा तात्पुरता दिलासाही मिळाला होता.

  • Share this:

पुणे, 08 नोव्हेंबर : डीएसके दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन पुणे कोर्टाने फेटाळून लावलाय. गुंतवणूकदारांनी पुणे पोलिसात तक्रारी दाखल केल्यानंतर डीएसके अंतरिम जामिनासाठी कोर्टात गेले होते. गेल्या मंगळवारी त्यांना सुनावणीसाठी 2 दोन दिवसांचा तात्पुरता दिलासाही मिळाला होता. पण आजच्या सुनावणीदरम्यान, उत्पात कोर्टाने डीएसके आणि त्यांची पत्नी हेमांगी कुलकर्णी यांचाही अटकपूर्व जामीन फेटाळून लावलाय.

डीएसकेंच्या पुण्यातल्या 'ड्रीम सिटी' प्रोजेक्टला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने डीएसके आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेत. त्यामुळे शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे डीएसकेंनी थकवलेत. त्यातल्या 20 गुंतवणूकदारांनी डिएसकेंविरोधात पुणे पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केलीय. यानंतर पुणे पोलिसांनी डीएसकेचं घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी छापे टाकलेत. तसंच या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात त्यांना अटकही होऊ शकते. म्हणूनच डीएसकेंनी ही अटक टाळण्यासाठी पुणे कोर्टात धाव घेतली होती. पण तिथंही त्यांचा जामिन फेटाळला गेल्याने ते अटकेची कारवाई टाळण्यासाठी हायकोर्टात जाऊ शकतात.

डिएसकेंनी शेकडो गुंतवणूदारांच्या मदतीने खुल्या बाजारातून तब्बल 8 हजार कोटीचं भांडवल उचललं होतं. त्यावर ते चढ्या भावाने व्याजदरही देत होते. पण नोटबंदीनंतर डीएसकेंचा पूर्ण आर्थिक डोलाराच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलाय. स्वतः डिएसकेंनाही कंपनीच्या सीएमडीपदावरून हटवण्यात आलंय. त्यामुळे डीएसके शेकडो गुंतवणूकदारांचे हजारो कोटी नेमके कसे फेडणार हा मोठा प्रश्नच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2017 03:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading