डीएसकेंना पत्नीसह दिल्लीतून अटक, पुण्यातील कोर्टात हजर करणार

डीएसकेंना पत्नीसह दिल्लीतून अटक, पुण्यातील कोर्टात हजर करणार

प्रसिद्ध बांधकाम उद्योजक डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीला अखेर दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. आज दुपारपर्यंत डीएसकेंना पुण्यात आण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

  • Share this:

 17 फेब्रुवारी, नवीदिल्ली : प्रसिद्ध बांधकाम उद्योजक डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीला अखेर दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. आज दुपारपर्यंत डीएसकेंना पुण्यात आण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय. गुंतवणूकदारांची 230 कोटींची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटकेपासून दिलेले संरक्षण शुक्रवारी उच्च न्यायालयाने काढून घेतल्याने डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना कोणत्याही क्षणी अटक करण्यात येणार होती. त्यांच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी चार पथके राज्याबाहेर रवाना झाली होती. अखेर आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दिल्लीतून डीएसके यांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. डीएसकेंना आज सकाळी दिल्लीतील ट्रांजिट कोर्टात हजर केल्यानंतर मग पुढे पुण्याला आणलं जाणार आहे. पुण्यातील कोर्टात हजर केल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून डिएसकेंच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे.

First published: February 17, 2018, 9:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading