नशेत एवढी बेधूंद झाली होती ही अभिनेत्री की गार्डनमध्येच झोपायचं होतं

नशेत एवढी बेधूंद झाली होती ही अभिनेत्री की गार्डनमध्येच झोपायचं होतं

दोघंही नशेत होते आणि हे कमी की काय दोघंही गार्डनमध्येच लोळत पडले होते.

  • Share this:

मुंबई, 8 मे- विकी कौशल आणि तापसी पन्नू या दोघांचं त्यांच्या मनमर्जियां सिनेमासाठी भरभरून कौतुक झालं. या सिनेमात दोघं रिलेशनशिपमध्ये दाखवण्यात आले होते. पण पडद्यामागे विकी आणि तापसीमध्ये फार चांगली बॉण्डिंग झाली होती. या बॉण्डिंगबद्दल बोलताना तापसी म्हणाली की, ‘सिनेमाच्या रॅपअप पार्टीमध्ये तिने आणि विकीने भरपूर दारू प्यायली होती. यामुळे दोघंही नशेत होते. हे कमी की काय दोघंही गार्डनमध्येच लोळत पडले होते आणि त्या दिवशी तापसीला पार्कातच झोपायचं होतं.’

तापसीची हीच गोष्ट विकीने पुढे नेत म्हटलं की, ‘ते हॉटेलमधलं गार्डन होतं. आम्ही सिनेमाच्या चित्रीकरणासाठीच तिथे थांबलो होतो. रात्रीचं जेवण झाल्यावर आम्ही फिरायला जायचो. त्या रात्री तापसी नशेत होती आणि तिला तिथेच झोपायचं होतं. मी तिचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला. तिला धमकीही दिली की मी निघून जातोय.’

 

View this post on Instagram

 

See u in theatres :) #Manmarziyaan In theatres now ! 📷: @aalok_soni

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या मनमर्जियां सिनेमात प्रेमाचा त्रिकोण दाखवण्यात आला होता. यात तापसी पन्नू आणि विकी कौशलसोबत अभिषेक बच्चनचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती.

SPECIAL REPORT : फॅशनच्या नावाने चांगभलं!

First published: May 8, 2019, 4:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading