Home /News /news /

भयानक! या देशात लॉकडाऊन न पाळणाऱ्यांचा थेट होतो मर्डर, 8 लोकांचा मृत्यू

भयानक! या देशात लॉकडाऊन न पाळणाऱ्यांचा थेट होतो मर्डर, 8 लोकांचा मृत्यू

भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.18 टक्के एवढा आहे. जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.

भारतातला मृत्यू दर हा कमी असून तो सध्या 2.18 टक्के एवढा आहे. जगात हा दर सर्वात कमी असल्याचं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं.

एक असा देश आहे जिथे लॉकडाऊनच्या नियमांचं पालन न करणाऱ्याची थेट हत्या केली जाते.

    नवी दिल्ली, 16 जुलै : जगभरात कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. प्रत्येक देशात आणि राज्यात लॉकडाऊनसंदर्भात वेगवेगळे नियम ठरवण्यात आले आहेत. अशात एक असा देश आहे जिथे लॉकडाऊनच्या नियमांचं पालन न करणाऱ्याची थेट हत्या केली जाते. सगळ्यात वाईट बाब म्हणजे या देशाचं सरकारही या हत्या थांबवण्यात अपयशी आहे. हा देश म्हणजे कोलंबिया (Colombia). इथं देशभरात सरकारकडून लॉकडाऊन सुरू आहे. परंतु इथल्या काही माफियांनी स्व:तहाच लॉकडाऊन जाहीर केलं आणि त्याचे नियम बनवले आहेत. जे कोणी लॉकडाऊनचं पालन करत नाही त्याला या ड्रग माफियांकडून ठार करण्यात येतं. आतापर्यंत अशा 8 जणांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या देशाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. द गार्डियनमध्ये प्रकाशित झालेल्या ह्युमन राइट्स वॉचच्या अहवालानुसार, शहरात काही माफिया लोकांना व्हॉट्सअ‍ॅपवरून लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास सांगत आहेत. यातील काही ड्रग माफिया 50 वर्षांपेक्षा जास्त जुने आहेत. राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरूच, वाचा आजची आकडेवारी मिळालेल्या माहितीनुसार, हे ड्रग माफिया जास्त करून ग्रामीण भागातील लोकांना छळत आहेत. तुमाको शहराची सर्वात वाईट परिस्थिती आहे. हे एक असं बंदर आहे जिथे ड्रग माफिया आणि पोलीस यांच्यात वारंवार हिंसाचाराच्या घटना समोर येत असतात. तुमको शहरातील नागरिकांना नदीत मासेमारी करण्यासाठी जाणार नाही अशी धकमी ड्रग माफियाकडून देण्यात आली आहे. संध्याकाळी 5 नंतर कोणतीही दुकाने किंवा बाजारपेठा उघडणार नाहीत. रस्त्यावर कोणीही दिसणार नाही. आणि असं काही झाल्यास थेट गोळ्या घातल्या जात आहेत. लॉकडाऊनमुळे गटारीच्या दिवशी मटण दिवसभर मिळणार का? खरंतर, कोलंबिया सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. या देशातल्या 1.60 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 5625 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दररोज 5000 पेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणं समोर येत आहेत. त्यात माफियांच्या अशा धमकीमुळे आणि हत्येच्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
    Published by:Renuka Dhaybar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या