पहिल्यांदाच धावणार ड्रायव्हरलेस ट्रक; 'ही' आहेत फीचर्स

पहिल्यांदाच धावणार ड्रायव्हरलेस ट्रक; 'ही' आहेत फीचर्स

प्रति तास 85 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या या ट्रकमध्ये करण्यात आला आहे 5G तंत्रज्ञानाचा वापर

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मे : एडव्हॉन्स टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच गोष्टी सहज साध्य झाल्या आहेत. ड्रायव्हरलेस ट्रेन, ड्रायव्हरलेस कारच्या या रेसमध्ये आता ड्रायव्हरलेस ट्रकसुद्धा उतरला असून, ड्रायव्हर शिवाय हा ट्रक धावणार आहे. विना ड्रायव्हरच्या या ट्रकची चाचणी पहिल्यांदाच स्वीडनच्या रस्त्यांवर घेतली जात आहे. हा प्रयोग यशस्वी ठरला तर त्याचं कमर्शियल लांचिंग होणार आहे.


किंमत 5000 रुपयांपेक्षाही कमी असलेल्या 'या' फोनमध्ये मिळतील तुम्हाला iPhone सारखे फीचर्स


स्वीडिश स्टार्टअपने तयार केला ड्राईवरलेस ट्रक

स्वीडिश स्टार्ट-अप कंपनी 'ईनराइड'ने हे मॉडेल तयार केलं असून, त्याची चाचणी घेण्याची परवानगी स्वीडन सरकारने दिली आहे. त्यासाठी एका औद्यागिक क्षेत्रातील गोदामापासून ते एक टर्मिनलपर्यंतच्या एका सार्वजनिक मार्गाचं परमिट देण्यात आलं आहे. जे 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध राहणार आहे.

या ड्रायव्हरलेस ट्रकला 'टी-पॉड' असं नाव देण्यात आलं असून, बुधवारपासून त्याचं टेस्टिंग सुरू करण्यात आलं असल्याची माहिती 'ईनराइड'ने दिली.

Einride आणि DB Schenker या दोन कंपन्यांनी मिळून नोव्हेंबर-18 मध्ये स्वीडनच्या जोंकोपिंग शहरात 'टी-पॉड'ची निर्मिती केली. हा जगातला पहिला ड्रायव्हरलेस ट्रक असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या ट्रकद्वारे माल वाहतूक करताना कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन 2030 पर्यंत 60 टक्क्यांनी कमी होईल असा दावा 'ईनराइड'ने केला आहे.


हॉटस्पॉटचं इंटरनेट वापरणं होणार आणखी सोपं; बदलणार 'हे' नियम


या ट्रकमध्ये केला आहे 5 जी तंत्रज्ञानाचा वापर

कंपनीच्या मते, ट्रकचे ऑपरेटरद्वारे फक्त निरीक्षण केलं जातं. ऑपरेटर केवळ आवश्यक असल्यास नियंत्रण ठेवतो. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, हा ट्रक 85 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकतो, परंतु चाचणीदरम्यान फक्त 5 किमी प्रति तास वेगाचीच परवानगी मिळाली आहे. यात थ्रीडी सेन्सर आणि 360 डिग्री रोटिंग कॅमेरा आणि रडार लावण्यात आलं आहे. या ट्रकची संपूर्ण सिस्टम 5 जी नेटवर्कद्वारे जोडलेली आहे.


 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2019 06:34 PM IST

ताज्या बातम्या