उत्तर प्रदेशात धावणार ड्रायव्हरशिवाय गाड्या

उत्तर प्रदेशातील योगी सरकार जगातील सर्वात आधुनिक वाहतूक यंत्रणे अंतर्गत ड्रायव्हर लेस पॉड म्हणजेच बिना ड्राइवरची गाडी आणण्याची योजना आखत आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2017 01:11 PM IST

उत्तर प्रदेशात धावणार ड्रायव्हरशिवाय गाड्या

09 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील योगी सरकार जगातील सर्वात आधुनिक वाहतूक यंत्रणे अंतर्गत ड्रायव्हर लेस पॉड म्हणजेच बिना ड्राइवरची गाडी आणण्याची योजना आखत आहे.जर सरकारने या योजनेला मंजुरी दिली तर सिंगापूरसारखं उत्तर प्रदेशात देखील 'ऑलवेज ऑन, ऑलवेज अवेलेबल' असं म्हणत लोक याचा आनंद घेऊ शकतात.त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत सिंगापूरच्या एक कंपनीने बुधवारी या योजनेचं सादरीकरण केलं.सादरीकरण पाहिल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या योजनेची स्वीकारार्हता आणि व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यास सांगितले आहे.

सादरीकरणानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, 'शहर भागातला वाहतुकीचा अडथळा दूर करणे आणि सोयीस्कर वाहतूक व्यवस्था देणे गरजेचे आहे. मेट्रोला वगळता सर्वच पर्याय योग्यरित्या अभ्यासण्याची सरकारची इच्छा आहे. या प्रणालीवर काही निर्णय घेण्याआधी, शहरात या योजनेची काय गरज आहे याचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे.'

या बैठकीसाठी मुख्य सचिव राजीव कुमार, प्रमुख सचिव एसपी गोयल, प्रमुख सचिव गृहमंत्री मुकुल सिंघल, विशेष सभेचे मुख्य सचिव मुख्यमंत्री अमित सिंग, लखनौ मेट्रोचे एमडी कुमार केशव आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

पीआरटी (Personal rapid transit)म्हणजे काय ?

ही ड्रायव्हरलेस कार पीआरटीच्या अंतर्गत रस्त्यावर नाही तर रस्त्यावर आखलेल्या स्ट्रक्चरवर चालते. प्रवाश्याने बटन दाबलं की ही गाडी स्वत: त्याच्याकडे जाते. 'ऑलवेज ऑन, ऑलवेज अवेलेबल' सारखं ही कधीही आणि कोणासाठीही उपलब्ध होणारी आहे. ही जगातील सगळ्यात आधुनिक वाहतूक यंत्रणा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 01:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...