सिंगापूर 01 जानेवारी : चहा आवडणार नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. सकाळी चहा घेतल्याशीवाय जवळपास प्रत्येकाचाच आता दिवसच सुरू होत नाही एवढ वेड चहाचं लागलंय. जगभरच चहाचं हे वेड बघायला मिळतं. आता या चहा शौकिनांसाठी एक खुशखबर आहे. तुम्ही दररोज एक कप गरमागरम चहा घेत असला तर तुम्हाला म्हातारपण लवकर येणार नाही असा निष्कर्ष एका संशोधनात निघालाय. त्यामुळे चहा प्या आणि तरुण राहा. National University of Singaporeने केलेल्या एका संशोधनात हे आढळून आलंय. चहा घेतल्यानंतर काय होतं याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला होता. National University of Singaporeने यासाठी 36 जणांची निवड केली होती. निवडकेल्याल्या सगळ्यांचं वय हे 60 च्या आसपास होतं. त्यांना दररोज सकाळ आणि संध्याकाळ अस दोन वेळा गरमागम चहा देण्यात येत असे. त्यानंतर शास्त्रज्ञांची टीम त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करत असे. 2015 ते 2018 या काळात हा अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासात शास्ज्ञांना उत्साहवर्धक निष्कर्ष आढळून आलेत. ज्यांनी चहा घेतला अशा लोकांचा मेंदू जास्त तरतरीत असतो असं आढळून आलंय. वय झाल्यामुळे मेंदुमध्ये जो भाग डिटोरेट होत असतो. म्हणजेच तरुणपणा जाऊन प्रौढत्व यायला लागतं ती प्रोसेस लांबणीवर पडते असं आढळून आलंय. ग्रीन टी, ब्लॅक टी, असे वेगवेगळे चहा त्यांना देण्यात आले होते. याबाबतचा संशोधन अहवाल Aging या सायन्सविषयक मासिकात आला आहे.
NEW YEAR 2020: नवीन वर्ष चांगलं जावसं वाटतंय? मग या 10 गोष्टी नक्की करून पाहा
इतर देशांमध्ये भारतात घेतात तसा दुधाचा चहा घेत नाहीत. त्याचप्रमाणं त्यात साखरेचंही प्रमाण कमी असतं. अनेक ठिकाणी लिंबू टाकूनही चहा घेतला जातो. शास्त्रज्ञ आता यावर आणखी संशोधन करणार आहेत.
Published by:Ajay Kautikwar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.