मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धक्कादायक! महाराष्ट्रात एका महिन्यात 300 शेतकऱ्यांची आत्महत्या, सत्तानाट्य सुरू असताना शेकडो कुटुंब उघड्यावर

धक्कादायक! महाराष्ट्रात एका महिन्यात 300 शेतकऱ्यांची आत्महत्या, सत्तानाट्य सुरू असताना शेकडो कुटुंब उघड्यावर

गेल्या 4 वर्षात एका महिन्यात आत्महत्येची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. याआधी 2015 मध्ये एका महिन्यात 300 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 03 डिसेंबर : राज्यातील सत्ता स्थापनेचा संघर्ष संपल्यानंतर आता खातेवाटपाचा गोंधळ सुरू आहे. अद्याप राज्याचे सरकार स्थिर झालेलं नसताना एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्यात राज्यात सर्वच पक्ष सत्तेचा सारीपाट जिंकण्यासाठी स्पर्धा करत होते. सत्तेची खुर्ची मिळवण्यासाठी नेते धडपडत असताना एकाच महिन्यात तब्बल 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या 4 वर्षात एका महिन्यात आत्महत्येची ही सर्वाधिक आकडेवारी आहे. याआधी 2015 मध्ये एका महिन्यात 300 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या.

नैसर्गिक संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसमोर जगण्याचा प्रश्न उभा ठाकला असताना नेते मात्र सत्ता काबिज करण्यामध्ये व्यग्र होते. 2019 मध्ये पावसाने एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे महापूर अशी विचित्र परिस्थिती राज्यात निर्माण केली होती. यामुळे राज्यात नोव्हेंबर महिन्यात 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ऑक्टोंबर महिन्यात अवकाळी पावसाने हाताशी आलेलं पिक गेलं. शेतकऱ्यांचे पीक 70 टक्के खराब झाले. त्यानंतर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले. 2018 मध्ये ऑक्टोंबर-नोव्हेंबरच्या दरम्यान झालेल्या आत्महत्येच्या घटनांपेक्षा 2019 मध्ये या काळात 61 टक्के वाढ झाली.

मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसल्या. या भागात नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक 120 आत्महत्येच्या घटना घडल्या. त्याखालोखाल विदर्भात 112 आत्महत्या झाल्या. शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये इतकी वाढ झाली की गेल्या 4 वर्षात ही आकडेवारी सर्वाधिक ठरली.

2019 मध्ये एकूण 2 हजार 532 आत्महत्या झाल्या. तर 2018 मध्ये हीच संख्या 2 हजार 518 इतकी होती. राज्यात अवकाळी पावसाने एक कोटी लोकसंख्येला फटका बसला. यात मराठवाड्यातील 44 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. आता या शेतकऱ्यांना राज्य सरकार नुकसान भरपाई देत आहे.

राज्यात शेतकऱ्यांना आतापर्यंत 6 हाजर 552 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती आहे. नव्या ठाकरे सरकारने शेतकरी कर्जमाफी केली. त्यापूर्वी 2017 मध्ये महाराष्ट्रात भाजप सरकारने कर्जमाफी केली होती.

First published:

Tags: Farmer suicide