दाभोळकरांसाठी वापरलेले पिस्तुल पोलिसांच्या ताब्यात?

दाभोळकरांसाठी वापरलेले पिस्तुल पोलिसांच्या ताब्यात?

छापा टाकताना सातारा पोलिसांनाही घरात येऊ दिले नाही

  • Share this:

औरंगाबाद, २२ ऑगस्ट- डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकऱणात दर दिवशी एक नवीन माहिती मिळत आहे. दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी एसीएस आणि सीबीआयच्या पथकाने मंगळवारी पहाटे आणखीन तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. या तीन संशयीतांपैकी दोन संशयीत हे सचिन अंदुरेचे मेहुणे आहेत तर एक धावणी मोहल्ल्यातील संशयीताला ताब्यात घेतलं आहे. पथकाने देवळाई येथील मनजीत प्राईड अपार्टमेन्टमधून या तिघांना ताब्यात घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी आरोपींकडून एक पिस्तुल जप्त करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत या तीनही आरोपींची एटीएसच्या कार्यालयात कसून चौकशी करण्यात आली.

सीबीआय या प्रकरणाची चौकशी करताना त्यांनी मंगळवारी पहाटे अचानक मनजीत प्राईड सोसायटीमधील ए विंगमधील १ नंबर घरावर छापा टाकला. या घरात शुभम सुरळे (वय २२), अजिंक्य सुरळे (वय, २४) आणि रोहित रेगे (वय, २३) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. यात सूर्यकांत आणि अजिंक्य हे अंदुरेचे मेहूणे आहेत. हे घर नागमोडे या महिलेचे असून नचिकेत इंगळे या घरात गेल्या दोन वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत आहे. तिघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी रोहितच्या धावणी मोहल्ल्यातील घराची झडती घेतली. या झडतीत पोलिसांनी एक पिस्तुल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तिघंही संशयीत महाविद्यालयीन विद्यार्थी असून शुभम हा सचिन अंदुरेचा सख्खा मेहूणा आहे तर अजिंक्य चुलत मेहूणा आहे. रोहितच्या घरी आई आणि एक लहान भाऊ आहे. त्याचे वडील शासकीय कर्मचारी होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. सध्या तरी हे तीनही संशयित पोलीसांच्या ताब्यात असून त्यांचा डॉ. दाभोळकरांच्या खुनाशी संबंध आहे का हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

पथकाने या छाप्यात सातारा पोलिसांची मदत घेतली. मंगळवारी पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी मनजीत प्राईड अपार्टमेन्टमध्ये छापा घालताना अपार्टमेन्टच्या रजिस्टरमध्ये पथकाने  इन आणि आऊटची नोंद केली. तसेच छापा टाकताना सातारा पोलिसांनाही घरात येऊ दिले नाही. इमारतीमधून कोणालाही आत सोडू नका तसेच बाहेरही जायला देऊ नका अशा सुचना पथकाने सातारा पोलिसांना दिल्या होत्या.

 

First published: August 22, 2018, 9:06 AM IST

ताज्या बातम्या